अमोल कोल्हेंनी कोणाला पाठवली डोकेदुखीची गोळी? फडणवीसांचं नाव घेत काढला पाणउतारा, म्हणाले... पाहा Video

Amol kolhe In khupte tithe gupte: राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची मनसोक्त उत्तरं दिली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.

Updated: Jul 17, 2023, 09:27 PM IST
अमोल कोल्हेंनी कोणाला पाठवली डोकेदुखीची गोळी? फडणवीसांचं नाव घेत काढला पाणउतारा, म्हणाले... पाहा Video title=
Amol kolhe, khupte tithe gupte,Video

Dr Amol kolhe On Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाला (Maharastra Politics) उधाण आल्याचं दिसून येतंय. अजित पवार यांनी काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरुद्ध जाऊन वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादी (NCP) कोणाची? असा सवाल आता विचारला जात आहे. अशातच आता  राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची मनसोक्त उत्तरं दिली. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?

काही औषधाच्या गोळ्या आहेत त्या तुम्ही कोणाला पाठवाल? असा सवाल अवधुत गुप्तेने अमोल कोल्हे यांना केला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. त्यानंतर स्मरणशक्तीची गोळी कोणाला पाठवाल, असा सवाल अमोल कोल्हे यांना विचारला गेला. त्यावेळी, मी ही गोळी माननीय पंतप्रधानांना पाठवेल, असं म्हणत कोल्हे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. एनर्जी वाढवण्याची गोळी कोणाला द्याल, असं विचारल्यावर त्यांनी आता मलाच ही गोळी घ्यावी लागेल, असं कोल्हे म्हणाले. आता निवडणुका जवळ येणार असल्याने आता मलाच घ्यावी लागेल, असं म्हणतात एकच हास्यकल्लोळ उडाला. 

शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं, राज ठाकरेंच्या या आरोपाची अवधुत गुप्तेने आठवण करून दिली. त्यावेळी अमोल कोल्हेंनी प्रश्नाचा पाणउतारा काढला. पवार साहेबांनी जातीचं राजकारण आणलं असं कुणी म्हणत असेल, तर साहेबांनी जेव्हा ३३ टक्के महिलांचं आरक्षण सुरू केलं तेव्हा त्यांनी हा विचार केला नाही की ती महिला कोणत्या जातीची असणार आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची पाठराखण केली.

पाहा Video

दरम्यान, शरद पवारांनी हिंजेवाडीत आयटी पार्क स्थापन केलं, त्यात काम करणारे तरूण आज विचारत आहेत की, शरद पवारांनी काय केलं? ज्या माणसाने हे सगळं आणलंय त्याबद्दल आपण असं म्हणणार आहोत का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला. कोल्हे यांनी या कार्यक्रमात अनेक प्रश्नांची उत्तर दिली. रविवार 23 जुलै रात्री 9 वा झी मराठीवर हा शो पाहता येणार आहे.