मुंबई : अभिनेता आमिर खान आणि क्रिकेटर विराट कोहली खास दिवाळीनिमित्त त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत.
एक खास चॅट शो दिवाळीनिमित्त झी टिव्हीवर प्रसारित होणार आहे.
विराट आणि अनुष्का यांच्यामधील नातेसंबंध मीडियापासून फार काळ लपून राहिलेला नाही. अनुष्का त्यांच्या रिलेशनशिपबाबत सावध बोलते पण विराट त्याच्या स्वभावाप्रमाणे रिलेशिप बाबतही खुलेपणाने बोलतो.
विराट आणि आमिरच्या या चॅट शोचा एक प्रोमो टेलिकास्ट झाला आहे. यामध्ये तो अनुष्काला 'नुश्की' म्हणाल्याचे तुम्ही पाहू शकाल. नुश्की इनामदार असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
Dekhiye Diwali Special, Aamir aur Virat ke saath!
Tune in on 15 Oct at 12pm!@aamir_khan @imVkohli @Aparshakti#DilwaaliWithAamirAndVirat pic.twitter.com/yMzDvF3Qbx— Zee TV (@ZeeTV) October 12, 2017
दिवाळी स्पेशल चॅट शो मध्ये विराटने त्याच्या आयुष्यातील काही खाजगी गोष्टींबाबतीतही खुलासा केला आहे. अनुष्काची कोणती सवय आवडत नाही ? हे विचारल्यानंतर विराटने तिची हमखास ५-१० मिनिटं उशीरा येण्याची सवय आवडत नसल्याचे सांगितले आहे. सोबतच या शो मध्ये विराटने आमिरसोबत ठुमकेदेखील लावले आहे.