विराट - अनुष्काचा 'हा' अनसीन व्हिडिओ पाहिलात का?

विरूष्का ही बॉलिवूड असो वा क्रिकेट सगळ्यातली हिट जोडी. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 15, 2018, 09:06 AM IST
विराट - अनुष्काचा 'हा' अनसीन व्हिडिओ पाहिलात का?  title=

मुंबई : विरूष्का ही बॉलिवूड असो वा क्रिकेट सगळ्यातली हिट जोडी. 

या जोडीने 11 डिसेंबर 2017 मध्ये इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केलं.  त्यानंतर मुंबई आणि दिल्लीमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शनही दिले. ज्यामध्ये बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.  अनेकांनी विरूष्काची रिसेप्शन पार्टी एन्जॉय करताना मनसोक्त डान्स केला. यांच्यासोबत नवदाम्पत्य विरूष्कानेही ठुमके लावले. त्यातीलच एक अनसीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पाहा तो अनसीन व्हिडिओ 

 

@anushkasharma & @virat.kohli dancing away at their Mumbai reception #Virushka #VirushkaReception

A post shared by _virat_18_lovers (@_virat_18_lovers) on

विरूष्काने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चांगलाच एन्जॉय केला होता. दोघांनी आपल्या मित्रांसोबत जबरदस्त डान्स करताना सगळ्यांचीच मने जिंकली होती. त्या कार्यक्रमानंतर अनेक व्हिडिओ आपण पाहिले. पण आता व्हायरल झालाला हा व्हिडिओ थोडा खास आहे. कारण दोघेही ‘मेरे रेश्के कमर...’ या अतिशय लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना बघायला मिळत आहेत. 

लग्नानंतर दोघेही दक्षिण आफ्रिकेला हनिमूनसाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर दोघेही लगेचच कामावर परतले. विराट दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत व्यस्त झाला तर अनुष्का तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली.