Viral Video : स्विमिंग पूलमध्ये जॅकलीनसोबत दिसला सुशांत

पाहा हा व्हिडिओ 

Updated: Oct 5, 2019, 12:24 PM IST
Viral Video : स्विमिंग पूलमध्ये जॅकलीनसोबत दिसला सुशांत  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'ड्राइव' (Drive) 1नोव्हेंबर रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. स्टीमिंग पोर्टलने शुक्रवारी 'ड्राइव' लाँच टेडची घोषणा केली आहे. तरूण मनसुखानी या सिनेमाचे दिग्दर्शक असून धर्मा प्रोडक्शन बॅनर अंतर्गत हा सिनेमा तयार होत आहे. 

सिनेमातील पहिलं गाणं 'मखना' शुक्रवारी लाँच झालं आहे. इस्त्राइलच्या सुंदर ठिकाणी या गाण्याचं शुटिंग झालं आहे. जॅकलीन आणि सुशांतसोबत चांगली केमेस्ट्री जुळून आली आहे. तसेच या सिनेमात बोमन ईरानी, पंकज त्रिपाठी आणि विभा छिब्बर देखील कलाकार असणार आहे. 

आयएएनएसच्या मुलाखतीत सुशांतने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहाल तर तुम्हाला कळणारच नाही की पुढे नेमकं काय होणार आहे. सुशांत आणि जॅकलीन पहिल्यांदा एकत्र दिसणार स्क्रीनवर तर असच होणार, असं देखील सुशांत म्हणाला. 'छिछोरे' हा सुशांतचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या सिनेमात सुशांतसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील दिसत आहे.  

ड्राइव हा ऍक्शन थ्रिलर सिनेमा आहे. ज्याच्या स्टोरी लाइनबद्दल अजून खुलासा झालेला नाही. गाण्याची सुरूवात एका विलापासून झाली आहे. त्यानंतर पूल पार्टी, मग मित्रांसोबत नाइट आऊट, वॅकेशन आणि मार्टीचा मूड सेट होण्याकरता या गाण्यात सगळं काही आहे. महत्वाचं म्हणजे गाण्यातील बराचसा भाह हा सेल्फी कॅमेऱ्याच्या अँगलने शूट केलं आहे. सोबत जॅकलीनचा खास अंदाज पाहायला मिळेल.