व्हिडिओ : 'मेरे रश्के कमर'वर भरतनाट्यम वायरल...

'बादशाहो' सिनेमातील एक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलंय. याच गाण्यावरचा एक भरतनाट्यम डान्सही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

Updated: Jul 19, 2017, 01:25 PM IST
व्हिडिओ : 'मेरे रश्के कमर'वर भरतनाट्यम वायरल... title=

नवी दिल्ली : 'बादशाहो' सिनेमातील एक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलंय. याच गाण्यावरचा एक भरतनाट्यम डान्सही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

'मेरे रश्के कमर... तू ने पहिली नजर... जब नजर से मिलाई... मजा आ गया...' असे या गाण्याचे बोल... हे गाणं ४० वर्षांपूर्वी नुसरत फतेह अली खान यांनी गायलं होतं... त्यानंतर आता हे गाणं रिक्रिएट करत राहत फतेह अली खान यांनी गायलंय.

Dance n Inspire नावाच्या एका फेसबुक अकाऊंटवरून या गाण्याचा एक डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओत गाम्यावर सेमी क्लासिकल फॉर्ममध्ये म्हणजेच भरतनाट्यम प्रकाराता हाच डान्स सादर करण्याता आलाय. पाहा, हाच व्हिडिओ...