सलमान खानने कापले चाहत्याचे केस; असं करण्यामागचं कारण काय? वाचा

सलमान खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार आहे.

Updated: Apr 16, 2022, 06:01 PM IST
सलमान खानने कापले चाहत्याचे केस; असं करण्यामागचं कारण काय? वाचा title=

मुंबई : सलमान खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याची एका झलकसाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दुसरीकडे, जर सलमान स्वत: चाहत्यांना भेटायला पोहोचला तर चाहत्यांची प्रतिक्रिया काय असेल हे तुम्ही समजूच शकता. पण इथे दबंग खान म्हणजेच सलमान केवळ त्याच्या चाहत्यांना भेटत नाही तर केस कापताना दिसत आहे. नुकताच सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या चाहत्याचे केस कापताना दिसत आहे.

कापले फँन्सचे केस
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जूना आहे. एका शोच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं दिसत आहे. सलमान खान त्याच्या चाहत्याचे केस कापण्यासाठी आल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अतिशय स्टाईलमध्ये तो त्याच्या चाहत्याचे केस कापताना दिसत आहे. याचबरोबर तो त्याच्या चाहत्याचे केस कापून मधून टक्कल पाडतो. त्याचबरोबर चाहतेही मागून सलमानच्या या कृत्यावर ओरडताना दिसत आहेत. याचबरोबर त्याची ही स्टाईल पाहून काही चाहते जोर-जोरात हसत आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ पाहून यूजर्सचे रिएक्शन
हा व्हिडीओ इथेच संपत नाही. सलमान त्याच्या चाहत्याकडे कापलेल्या केसांची फी मागतो. त्यानंतर हा फॅन सीटवरून खाली उतरतो आणि त्याचे केस बघतो आणि पर्समधून 100 ची नोट काढतो. यानंतर सलमान खानही हैराण होतो. या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत की, एका यूजरनं लिहिलं, अरे काय, बनवलं बिचाऱ्याला, तर काही चाहत्यांना त्यांच्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.