खास व्यक्तींसोबत अनुष्का- प्रभासची परदेशात धमाल

 पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे.  

Updated: Oct 19, 2019, 04:43 PM IST
खास व्यक्तींसोबत अनुष्का- प्रभासची परदेशात धमाल  title=
खास व्यक्तींसोबत अनुष्का- प्रभासची परदेशात धमाल

मुंबई : बॉक्स ऑफिस आणि संपूर्ण चित्रपट वर्तुळातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या  'बाहुबली' या चित्रपटाचे विक्रम हे दिवसागणिक वाढतच आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जात आहे. एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या या चित्रपटाची आता पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे.  

'बाहुबली'च्या या चर्चांमध्ये आता पुन्हा एकदा नावं पुढे येत आहेत ती म्हणजे 'बाहुबली' फेम प्रभास आणि अनुष्का शेट्टीची. सध्याच्या घडीला ही 'बाहुबली' फेम जोडी लंडनमध्ये धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांना साथ लाभली आहे ती म्हणजे चित्रपटातील इतर कलाकारांची आणि खुद्द दिग्दर्शकांची. 

लंडनच्या रॉबर्ट अल्बर्ट थिएटरमध्ये 'बाहुबली'च्या स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात येण्याच्या निमित्तानेच चित्रपटाची संपूर्ण टीम त्या ठिकाणी दाखल झाली आहे. 

खुद्द प्रभास आणि अभिनेता राणा डग्गुबती यांनीच सोशल मीडियावर या खास क्षणांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये 'बाहुबली' फेम सर्व चेहरे मोठ्या आनंदात दिसत आहेत. 'It’s a #RoyalReunion in London with my #Baahubali team!', या शब्दांत प्रभासने त्याची उत्सुकता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 

ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफस्क्रीन मैत्रीमुळे चर्चेत असणारी प्रभास आणि अनुष्का शेट्टीची जोडी या कारणामुळे बरीच चर्चेत आली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी म्हणाल तर, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या साहो या चित्रपटातून प्रभास झळकला होता. तर, अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. येत्या काळात ती आर. माधवनसोबत झळकणार आहे. तर, दिग्दर्शक राजामौली हेसुद्धा 'आरआरआर' या मल्टीस्टारर चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत.