Vinod Khanna Bold Statement : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विनोद खन्ना (Vinod Khanna) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. विनोद खन्ना हे या जगात नसले तरी त्यांचे सुपरहिट चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. विनोद खन्ना यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. हे एक असे अभिनेते आहेत ज्यांनी1970 आणि 1980 च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आणि ते बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार्स पैकी एक ठरले. दरम्यान, विनोद खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त अभिनेताच नाही तर खलनायकाच्या ही भूमिका साकारल्या आहेत. विनोद खन्ना यांनी बऱ्याचवेळा त्यांच्या बोल्ड विचारांमुळेही चर्चेत राहिले होते. त्यांच्या इच्छा काय आहेत या विषयी विनोद यांनी मोकळेपणानं सांगितलं होतं.
एका मुलाखतीत विनोद यांनी त्यांच्या आयुष्यात इंटिमेट रिलेशनशिप म्हणजेच शरीरसंबंधाचं महत्त्व किती आहे याचा खुलासा केला. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत विनोद खन्ना यांनी, ‘मी कोणी संत नाही, जो कोणत्याही महिलेवर प्रेम करणार नाही किंवा तिच्याबरोबर सेक्स करणार नाही.’ (vinod khanna viral video)
हेही वाचा : लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना चित्रपटाच्या सेटवर अभिनेता बेशुद्ध; Diet मुळे ही अवस्था?
या मुलाखतीत विनोद म्हणाले की, 'मी एक बॅचलर होतो आणि महिलांविषयी बोलायचं तर मी काही संत नाही. मलाही सेक्स किंवा शरीरसंबंधांची तेवढीच गरज आहे जेवढी इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला असेल. महिला नसत्या तर आज आपण इथे नसतो आणि शरीरसंबंध नसते तर आज आपण इथे नसतो. तर मग माझे महिलांशी संबंध असण्यावरच आक्षेप का घेतला पाहिजे.' (Vinod Khanna Bold Statement On physical relation And Women Old Video Goes Viral)
विनोद खन्ना यांचा पंजाबी कुटुंबात जन्म झाला होता. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले होते. विनोद खन्ना कॉलेजमध्ये असताना गीतांजली नावाच्या मुलीशी प्रेम करू लागले होोते. तर पुढे जाऊन 1971 मध्ये विनोद खन्ना आणि गीतांजली यांनी सप्तपदी घेतल्या. या दोघांनी दोन मुलं असून अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना अशी त्यांची नाव आहेत. दरम्यान, लग्नाच्या काही वर्षांनी विनोद खन्ना यांनी गीतांजली यांनी घटस्फोट दिला आणि कविता यांच्याशी लग्न केलं. (Vinod Khanna's First Wife and His Love)
डिसेंबर 1975 मध्ये विनोद खन्ना यांनी चित्रपट सोडून संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक चित्रपट निर्मात्यांना धक्का बसला. त्या काळात त्यांना 'सेक्सी संन्यासी' असेही संबोधले जात होते.
वर्षानुवर्षे मूत्राशयाच्या कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर, विनोद खन्ना यांनी 27 एप्रिल 2017 रोजी या जगाचा निरोप घेतला. यापूर्वी अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जर्मनीत त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली, तरीही त्यांचे निदान झाले नाही. पाकिस्तानातील पेशावर येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराला भेट द्यायची अशी त्यांची इच्छा होती, परंतु त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.आपल्या प्रदीर्घ बॉलिवूड कारकिर्दीत, त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, आणि एक सक्रिय राजकारणी आणि ते गुरुदासपूर, पंजाबचे खासदार होते.