दीपिकाच्या आवडत्या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; म्हणाली- 'बेडवर ओढून तिचे अंतर्वस्त्र...'

Vin Diesel :  लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता विन डिजलवर त्याच्याच माजी असिस्टंटनं केले लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप...

दिक्षा पाटील | Updated: Dec 22, 2023, 03:00 PM IST
दीपिकाच्या आवडत्या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; म्हणाली- 'बेडवर ओढून तिचे अंतर्वस्त्र...' title=
(Photo Credit : Social Media)

Vin Diesel : 'फास्ट एंड फ्यूरियस' अभिनेता विन डिजलवर त्याच्या माजी असिस्टंटनं लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. गुरुवारी लॉस एंजलिसमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, एस्टा जोनासनवर दावा केला आहे की विन डिजल जेव्हा 2010 मध्ये अटलांटात 'फास्ट फाइव' च्या सेटवर काम करत होता. तेव्हा विन डिजलनं तिचं लैंगिक शोषण केलं. तिनं दावा केला आहे की 2010 मध्ये जेव्हा विन डिजलनं एका हॉटेलच्या रुममध्ये तिला एका भिंतीसमोर उभे केले आणि तिच्यासमोर मास्टरबेट करू लागला होता. 

तक्रारित म्हटल्याप्रमाणे जोनासनला विन डिझेलच्या कंपनीची सगळी कामं करण्यास सांगितले होते. त्यात सोशल इव्हेंट्समध्ये डिझलसाठी सगळ्या गोष्टी पाहणं आणि त्यांच्यासोबत राहणं, त्यासोबतच विनसोबत सगळ्या कार्यक्रमांमध्ये जाणं, यासगळ्या गोष्टी तिला करण्यास सांगितल्या होत्या. या सगळ्या गोष्टी जोनासनच्या फर्म ग्रीनबर्ग ग्रॉसनं दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं. कंपनीच्या प्रवक्तानं म्हटलं की त्यांना त्यांच्या कस्टमरसोबत उभे राहून विन डिझेलच्या विरोधात आवाज उठवण्यात अभिमान वाटतो. खटल्यानुसार, सप्टेंबर 2010 मध्ये रात्री उशिरा, डिझेल जो पर्यंत येत नाही तो पर्यंत जोनासनला त्याच्या सेंट रेगिस हॉटेलमधील रुममध्ये थांबण्यास सांगितले होते. जेव्हा तो परत आला तेव्हा डिझेलनं कथितरित्या जोनसनचे मनगट धरले आणि तिला बेडवर ओढले. 

पुढे त्यात म्हटले आहे की 'जोनासन पळू शकत नव्हती आणि तिनं तिचे डोळे बंद केले. विन डिझेल नाराज होईल या कारणानं ती स्वत: ला त्याच्यापासून लांब करत होती. शारीरिक सुरक्षा आणि नोकरी घालवण्याच्या भितीमुळे ती विनला काहीही बोलण्याचा विचार फक्त तिच्यापर्यंत ठेवत होती. खरंतर, जेव्हा डिझेलनं तिचे अंतर्वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला की तो स्वत:ला थांबवू शकली नाही आणि ती ओरडू लागली. जसं त्यात म्हटलं आहे त्याप्रमाणे डिजेलनं तिला कथितप्रमाणे तिला भिंतीजवळ उभं केलं आणि तिचा हात त्याच्या गुप्तांगवर ठेवला. जेव्हा तो मास्टरबेट करत होता, तेव्हा जोनासननं तिचे डोळे बंद केले. जोनासनला असहय झालं आणि तिनं स्वत:वर प्रश्न उपस्थित केला आणि विचारलं की एक यशस्वी करिअर मिळवण्यासाठी शरीरासोबत हे सगळं करावं लागेल का?' 

हेही वाचा : Salaar Twitter Review : 'याला म्हणतात कमबॅक!' प्रभासचा 'सालार' पाहून नेटकऱ्यांना आठवला 'बाहुबली'

त्यात पुढे म्हटलं आहे की त्यातून एक गोष्ट कळली होती की तिला कामावरून काढण्यात येईल. कारण ती आता ती राहिली नाही. विन डिजलनं त्याच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा वापर केला होता आणि तिनं त्याच्या विरोधात आवज उठवला. आता सगळ्यांना प्रश्न आहे की पुढे यावर काय निर्णय घेण्यात येतो. पण नक्कीच याचा विन डिजेलच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे.