Vikram Gokhale: 'मला एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे...'; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल!

Raj Thackeray On Vikram Gokhale: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांच्या निधनानंतर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.  

Updated: Nov 26, 2022, 05:20 PM IST
Vikram Gokhale: 'मला एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे...'; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल!
Vikram Gokhale,Raj Thackeray

Vikram Gokhale Death: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन (Dinanath Mangeshkar Hospital) झालं आहे. मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्वात तसेच हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi cinema) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यानं नवी ओळख निर्माण करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विक्रम गोखले यांच्या निधनानंतर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले राज ठाकरे?

मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात अनेकदा असं जाणवत आलंय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच, असं राज ठाकरे म्हणतात.

आणखी वाचा - Vikram Gokhale: "विक्रमकाका, जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता..."; अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट!

विक्रम गोखले यांचा संवादफेक उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती. तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं, असंही ते म्हणाले आहेत.

पाहा ट्विट - 

मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन, अशी पोस्ट राज ठाकरे (Raj Thackeray On Vikram Gokhale) यांनी केली आहे.