विजय सेतुपतिची इंटरनेटवाली लव्ह स्टोरी! पत्नी पासून मुलांविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

Vijay Sethupathi's Love Story : विजय सेतुपतीच्या लव्ह स्टोरीविषयी तुम्हाला माहितीये का? एकमेकांना न पाहता झाली होती मैत्री... पत्नीच्या नावापासून मुलांपर्यंत 

दिक्षा पाटील | Updated: Sep 17, 2023, 03:58 PM IST
विजय सेतुपतिची इंटरनेटवाली लव्ह स्टोरी! पत्नी पासून मुलांविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का? title=
(Photo Credit : Social Media)

Vijay Sethupathi's Love Story : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक रेकॉर्ड केले आहेत. काली गायकवाड ही खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे विजय सेतुपतीनं सगळ्यांची मने जिंकली. मात्र, आज आपण विजय सेतुपतीच्या चित्रपटांची नाही तर त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊया...  त्यातल्या त्यात विजय सेतुपतीच्या लव्ह स्टोरीविषयी जाणून घेऊया...

विजय सेतुपति हा सोशल मीडियावर त्याच्या खासगी आयुष्याविषयी जास्त पोस्ट शेअर करत नाही. त्याच्या कुटुंबाचे फोटो किंवा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याला त्याचं आयुष्य खासगी ठेवायला आवडते. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्याची पत्नी आणि त्यांची प्यार वाली लव्ह स्टोरी... विजय सेतुपतीच्या पत्नीचं नाव जेसी सेतुपति आहे. जेसीला लाइमलाइटपासून लांब राहणं पसंत आहे. ती सगळ्यात शेवटी नयनताराच्या लग्नात दिसली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विजय सेतुपतिची लव्ह स्टोरी खूप मजेशीर आहे. त्या दोघांमध्ये सगळ्यात पहिलं बोलणं हे इंटरनेटच्या माध्यमातून झाली होती. विजयनं जेसीला मेसेज केला होता आणि मग त्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरु झालं. त्यानंतर त्यांची पहिली भेट कॉमन फ्रेंडच्या मदतीनं झाली. इंटरनेटवर त्यांची चॅटिंग सुरु झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात बुडाले. एका मुलाखतीत स्वत: विजय सेतुपतीनं सांगितलं की 'एकमेकांना न पाहता आमच्यात मैत्री झाली.' तर चित्रपटात येण्या आधी विजय सेतुपती दुबईत नोकरी करायचा. जेसी देखील तेव्हा दुबईत होती. ऑनलाइन चॅटिंग करत त्यांच्यात चांगली मैत्री झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षी विजय सेतुपतीनं लग्न केलं. मुलाखतीत त्याच्या करिअरच्या यशासाठी विजय सेतुपतीनं त्याच्या पत्नीला श्रेय दिलं होतं. त्यानं सांगितलं की त्याची पत्नी त्याला नेहमी हिंमत्त द्यायची आणि तिच्यामुळेच त्याचं फिल्मी करिअर चांगलं आहे. तर विजय आणि जेसीला दोन मुलं आहे. एक मुलगा असून त्याचं नाव सूर्या आहे तर लेकीटं नाव श्रीजा आहे. 

हेही वाचा : मुस्लिम कुटुंबात लग्न करण्यावरून करीना कपूरचा मोठा खुलासा म्हणाली...

जवान या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यानं भारतात बॉक्स ऑफिसवर 400 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा आकडा पार केल्याचे म्हटले जात आहे.