शिव शंकरांच्या रूपात 'हा' अभिनेता; चाहते म्हणाले...

सोमवार हा दिवस आपण शिव शंकरांच्या भक्तीसाठी समर्पित करतो. 

Updated: Mar 22, 2021, 12:36 PM IST
शिव शंकरांच्या रूपात 'हा' अभिनेता; चाहते म्हणाले... title=

मुंबई : आज सोमवार आहे. सोमवार हा दिवस आपण शिव शंकरांच्या भक्तीसाठी समर्पित करतो. सोमवारचं महत्त्व लक्षात घेत  अभिनेता विद्यूत जामवाने चाहत्यांसाठी शिव शंकरांचं एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हुबेहुब महादेवांसारखाच दिसत आहे. विद्यूतच्या एका चाहत्याने  हे चित्र त्याला हे चित्र पाठवलं आहे. शंकरांचं चित्र विद्यूतने  त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. महादेवांचा हा फोटो सध्या तुफान चर्चेत आहे. 

विद्यूतच्या पोस्टला आतापर्यंत अनेकांनी लाईक केलं आहे. अनेकांनी तर चित्र पाहूण 'हर हर  महादेव' असं कमेंट केलं आहे. विद्यूतच्या चाहत्यांना देखील शिव शंकरांचं चित्र फार आवडलं आहे. तर एका चाहत्याने विद्यूतला शिव शंकरांच्या भुमिकेत पाहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सर्वांना आकर्षित करेल असं हे चित्र आहे.