Nia Sharma चं 'त्या' किसवर स्पष्टीकरण, 'तेव्हा परिस्थिती वेगळी होती...'

टी.व्ही विश्वातील सर्वात बोल्ड अभिनत्री म्हणून देखील नियाला ओळखलं जातं.  

Updated: Mar 22, 2021, 09:54 AM IST
Nia Sharma चं 'त्या' किसवर स्पष्टीकरण, 'तेव्हा परिस्थिती वेगळी होती...'  title=

मुंबई : टी.व्ही अभिनेत्री निया शर्मा कायम तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. शिवाय भारतीय टी.व्ही विश्वातील सर्वात बोल्ड अभिनत्री म्हणून देखील तिला ओळखलं जातं. नेहमी स्वतःच्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नियाच्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गेल्या वर्षी निया शर्माची 'ट्विस्टेड' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. तेव्हा नियाच्या लेस्बियन किसमुळे सर्वत्र वादळ उठलं होतं. पण आता नियाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

'ट्विस्टेड' वेबसीरिजला भले तीन पेक्षा  जास्त वर्ष झाली असली तरी सीरिजमधीस किसिंग सीन अद्यापही चर्चेत आहे. 'ट्विस्टेड' सीरिजच्या किसिंग सीनमुळे  नियाच्या करियरला नवं ट्विस्ट मिळालं. सीरिजमध्ये निया शर्माने अभिनेत्री ईशा शर्माला किस केलं होतं. सध्या किसिंग सीनबद्दल निया केलेले वक्तव्य तुफान चर्चेत आहे. 

काय म्हणाली निया
2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या 'ट्विस्टेड' सीरिजमधील नियाच्या लेस्बियन किसमुळे सोशल मीडियावर चांगलाचं हाल्लाबोल झाला. मात्र आता  खुद्द नियाने या सर्व प्रकरणाला पूर्ण विराम दिला आहे. एका मुलाखतीत तिने संबंधित विषयावर स्पष्टीकरण दिलं  आहे.

'जेव्हा मी 'ट्विस्टेड'मध्ये किसिंग सिन दिलं, तेव्हा  ओटीटी प्लॅटफॉर्म हवा तेवढा प्रसिद्ध नव्हता. मात्र आता मनोरंजनाचं सर्वात जास्त उत्तम मध्यम म्हणजे  ओटीटी प्लॅटफॉर्म...' असं म्हणत तिने आताच्या घडीचं ओटीटी प्लॅटफॉर्मची  लोकप्रियता सांगितली. 

'जेव्हा लेस्बियन किसिंग सीन दिलं, तेव्हा मला भीती वाटत होती. माझ्यासाठी कठिण होतं. पण  ती स्क्रिप्टची गरज होती. ' असं नियाने सांगितलं. नियाचं दिलेले किसिंग सीन स्पष्टीकरण सध्या चर्चेत आहे. 

सांगायचं झालं तर, निया 'जमाई राजा' मालिकेमुळे देखील चर्चेत आली होती. मालिकेमध्ये अभिनेता रवी दुबेने नियाच्या पतीची भुमिका साकारली होती, तेव्हा देखील त्यांच्या किसिंगमुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.