दिवाळी २०१७: तुमच्या शहरात कुठे आहे 'दिवाळी पहाट' चे कार्यक्रम

दिवाळीच्या दिवसांमध्ये रांगोळी, फटाके, तोरण आणि फराळाची रेलचेल असते.

Updated: Oct 16, 2017, 06:25 PM IST
दिवाळी २०१७: तुमच्या शहरात कुठे आहे 'दिवाळी पहाट' चे कार्यक्रम  title=

मुंबई : दिवाळीच्या दिवसांमध्ये रांगोळी, फटाके, तोरण आणि फराळाची रेलचेल असते.

यासोबतच महाराष्ट्रात दिवाळीच्या दिवसात दिवाळी पहाट आणि दिवाळी अंक या दोन गोष्टींचे खास विशेष आकर्षण असते. 

यंदा दिवाळीला जोडून शनिवार रविवार येत असल्याने तुम्ही सणाचा आनंद घेताना काही खास कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी वेळ नक्की राखून ठेवा. यंदा दिल्लीपासून मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद या शहरात अनेक दिग्गज कलाकारांनी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यापैकी काही निवडक कार्यक्रमांची ही खास झलक 

पहा कुठे आणि कोण सादर करतंय 'दिवाळी पहाट' 

धनत्रयोदशी ( १७ ऑक्टोबर-) -: 
राहुल देशपांडे आणि महेश काळे गाण्यांची मैफिल 
स्थळ आणि वेळ - स.भु. महाविद्यालय मैदान - औरंगाबाद / पहाटे ६.३० 

नरकचतुर्दशी (१८ ऑक्टोबर) 
संदीप खरे आणि वैभव जोशी (इर्शाद)
स्थळ आणि वेळ - यशवंत नाट्यगृह माटुंगा मुंबई / पहाटे ६.३० 

लक्ष्मीपूजन (१९ ऑक्टोबर) 
सुमीत राघवन,सुनील बर्वे, स्वरांगी मराठे  (सूर आले जुळूनी)
स्थळ आणि वेळ - यशवंत नाट्यगृह माटुंगा मुंबई / पहाटे ६.३० 

पाडवा (२० ऑक्टोबर) 
संदीप खरे आणि वैभव जोशी (इर्शाद)
स्थळ आणि वेळ - गडकरी रंगायतन / सकाळी १०.३० 

भाऊबीज (२१ ऑक्टोबर)
राहुल देशपांडे 
स्थळ आणि वेळ - इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र दिल्ली / पहाटे ६.३०