तुम्हालाही येऊ शकतो विद्या बालनचा फोन, मेसेज; अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

सध्या विद्याच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आले आहेत. तिची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. 

Updated: Jan 19, 2024, 06:04 PM IST
तुम्हालाही येऊ शकतो विद्या बालनचा फोन, मेसेज; अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय घडलं? title=

Vidya Balan Fake Instagram Account : अभिनेत्री विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्या बालनने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं आहे. तिने मालिकेपासून करिअरची सुरुवात केली असली तरी आता तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. पण आता विद्या बालनबरोबर एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. त्याबद्दल तिने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

विद्या बालन ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच विद्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिच्या नावे इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट सुरु असल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल तिने चाहत्यांना आवाहन केले आहे. तसेच याबद्दल तिने तक्रारही नोंदवली आहे. 

विद्या बालनने चाहत्यांना केली विनंती

"सर्वांना नमस्कार, आधी माझा फोन नंबर आणि आता माझ्या नावाचा वापर करत कोणीतरी फेक अकाऊंट सुरु केले आहे. @Vidya.balan.pvt असे या इन्स्टाग्राम हँडलचे नाव आहे. या अकाउंटद्वारे तो माझ्या नावाचा गैरवापर करत लोकांसोबत संपर्क करत आहे. मी आणि माझ्या टीमने याबद्दल रिपोर्ट केले आहे. तुम्हीही या अकाऊंटबद्दल रिपोर्ट करुन ते ब्लॉक करा, हे तुमच्यासाठी आणि पर्यायाने आमच्यासाठी चांगले असेल. ही व्यक्ती माझ्या नावाचा वापर करत अनेक मित्रांशी आणि जवळच्या लोकांसोबत चर्चा करत आहे. त्यामुळे तुम्ही या व्यक्तीशी संपर्क ठेवू नका. या व्यक्तीला रिपोर्ट आणि ब्लॉक करा", असे आवाहन विद्या बालनने केले आहे. 

Vidya Balan Post

विद्या बालन ही इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि रिल शेअर करताना दिसते. तिच्या रिल्सवर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तिचे रिल्सही लोकप्रिय होतात. मात्र सध्या विद्याच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आले आहेत. तिची ही पोस्टही व्हायरल होत आहे. 

दरम्यान, विद्या बालन काही दिवसांपूर्वी ‘नीयत’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने एका गुप्तहेराची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता लवकरच ती 'दो और दो प्यार मे' या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. या चित्रपटात तिच्यासोबत इलियाना डिक्रूझही दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्याबरोबरच ती लवकरच एका कॉमेडी चित्रपटात झळकणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.