Kushal Barike Dance Video: सध्या सगळीकडेच हवा आहे ती म्हणजे 'चला हवा येऊ द्या'ची. या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदीतले अनेक नामवंत सेलिब्रेटी हजेरी (Chala Hawa Yeu Dya) लावताना दिसतात. गेली नऊ वर्षे या कार्यक्रमानं मराठी तसेच अमराठी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोचे अनेक व्हिडीओही व्हायरल (Viral Video) होत असतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे लोकप्रिय आहेत पण त्यातील अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Barike) यांची जोडी भलतीच भाव खाऊन जाते. सध्या कुशल बद्रिकेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये कुशल हा नववारी साडीच्या वेषात दिसतो आहे. त्यानं लाल रंगाच्या जरीची साडी नेसली असून हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. लावणीच्या वेशभूषेत तो यावेळी दिसतो आहे. त्याच्या पायात घुंगरूही आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) एव्हाना या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिच्यासमोर नाच करता करता कुशल बद्रिकेचा तोल गेला आणि तेवढ्यात तो स्टेजपाशी कोसळला. निलेश साबळे त्याला सावरायला तेव्हा आला होता. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. कुशल बद्रिकेनंही आपल्या इन्टाग्रामपेजवरून (Khushal Barike on Instagram) हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ खाली नाना तऱ्हेच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. यावेळी निलेश साबळेनं त्याचा 'माझा वट्टा' हा स्पूफ कार्यक्रम आयोजित केला होता.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर आल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी चित्रपटातील 'चंद्रा' (Chandra Song) या गाण्यावर कुशलनं नाचायला सुरूवात केली. यावेळी स्नेहल शिदमनंही कुशल बद्रिकेसोबत ठुमका धरला होता. परंतु पुढल्या काही क्षणात असे काही झाले की कुशलचा तोल गेला की काय.. परंतु स्टेजच्या टोकाला आल्यानंतर तो जोरात खाली पडला आणि घरंगळत जमिनीवरच आडवा झाला. काही वेळासाठी सगळेच स्तब्ध झाले. अमृता खानविलकर आणि ऋताचा चेहरा हा कावारा बावरा आणि आश्चर्यचकित झाला होता.
कुशल खरंच पडला की काय असा प्रश्न पडत सगळ्यांनाच त्याची काळजी वाटू लागली. परंतु तो एक स्कीटचा भाग होता. 'चंद्रा' या गाण्यावर नाचता नाचता खाली पडल्यावर उठल्यानंतर कुशल म्हणतो, 'चंद्रावरचा खड्डामध्ये आल्यानं मी पडलो'. त्यानंतर त्यानं पुन्हा आपल्या स्कीटला सुरूवात केली. 'चला हवा येऊ द्या'च्या येत्या भागात अमृता खानविलकर, सायली संजीव, ऋता दुर्गुळे, रवी जाधव असे काही लोकप्रिय चेहरे यावेळी या शोमध्ये आले होते.
''अमृता खानविलकर ने केलेला 'चंद्रा'चा डान्स वाटतो तितका सोपा नाही बरं, आमच्या स्नेहल शिदमचा जवळ जवळ “जीव गेला” मला शिकवता शिकवता. शेवटी माझा नृत्याविष्कार बघून अमृताचाही जीव जाता जाता राहिला. एकदा अजय-अतुल यांना प्रत्यक्ष करुन दाखवेनच म्हणतोय माझा डान्स.” असं लिहितं त्यानं आपला अनुभव शेअर केला आहे.
या व्हिडीओखाली त्याचे चाहतेही त्याची काळजी करताना दिसत आहेत. एका युझरनं लिहिलंय की एका पंचसाठी एवढी रिस्क नाही घ्यायची. तुम्हाला स्पीकर लागला असता तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की अरे लागला असता ना स्पीकर तसेच अनेकांनी त्याच्या अभिनयाचेही कौतुक केले आहेत. तर काहींनी त्याची खिल्लीही उडवली आहे, एक युझरनं त्याच्या वाढवलेल्या वजनावरही कमेंट केली आहे.