Uorfi Javed Video: सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिच्या आगळ्या-वेगळ्या फॅशनसेन्समुळं चर्चेत असते. पण कधी कधी तिच्या विचित्र फॅशनसेन्समुळं ती ट्रोलदेखील होते. नकोशा असलेल्या वस्तू जमा करुन उर्फी त्यांच्यापासून नवनवीन आउटफिट ती तयार करते. प्लास्टिक बॅग्स असो किंवा लहान मुलांची खेळणी उर्फीने आत्तापर्यंत अशा वेगवेगळ्या वस्तू वापरुन आउटफिट तयार केले आहेत. अशातच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तीने सिगरेटचा वापर करुन नवीन ड्रेस तयार केला आहे. मात्र, नेटकऱ्यांना तिची ही आयडिया आवडली आहे.
उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वूम्पला या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फी रस्त्यावर पडलेले सिगारेटचे थोटुक उचलताना दिसत आहे. त्यानंतर त्यापासून तिने तिचा एक आउटफिट डिझाइन केला आहे. उर्फीने सिगारेटच्या थोटक्यांपासून इतका सुंदर आणि युनिक ड्रेस डिझाइन केल्यामुळं नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केले आहे. नंतर हा ड्रेस तिने परिधानही केला आहे.
उर्फीने डिझाइन केलेला ड्रेस पाहून हा सिगारेटपासून तयार केलेला आहे, या विश्वासच बसत नाही. या ड्रेसमध्ये उर्फी ग्लॅमरस व सुंदर दिसत आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडिओमध्ये धुम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते, असं आवाहन ही करण्यात आले आहे. उर्फीचा हा प्रयत्न पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.
उर्फीच्या या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट आल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, आज पहिल्यांदा सिगारेटचा योग्य उपयोग करण्यात आला आहे. तर, अन्य एका युजरने म्हटलं आहे की, पहिल्यांदा मला उर्फीचा ड्रेस आवडला आहे. तर, एकाने म्हटलं आहे की उर्फी या ड्रेसमध्ये चांगली दिसत आहे. रस्त्यावरील थोडाफार कचरा उर्फीने साफ केला आहे, असंही एकाने कमेंट करत म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिने साखरपुडा केल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. सोशल मीडियावर तसे फोटोही व्हायरल होत होते. यातील एका फोटोत उर्फी एका व्यक्तीच्या बाजूला बसली होती व दोघेही एकत्र पुजेला बसले होते. पण हा मिस्ट्री मॅन कोण आहे याचा खुलासा अद्यापही झालेला नाहीये. उर्फीची बहिणी उरुषाने हे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर हा व्यक्ती उर्फीचा होणारा नवरा असल्याचा तर्क लढवण्यात येत आहेत. मात्र, अद्याप उर्फीकडून याबाबत स्पष्टीकरण आले नाहीये.