शिल्पा म्हणाली, माझी इज्जत वाचविल्याबद्दल आभार

 शिल्पाने आपला स्कर्ट ठिक करत 'माझी इज्जत वाचविल्या बद्दल धन्यवाद.' असे दोघांना म्हटले. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 1, 2017, 11:02 AM IST
 शिल्पा म्हणाली, माझी इज्जत वाचविल्याबद्दल आभार title=

मुंबई : बिग ब़स मध्ये शिल्पा शिंदेला पाहणे लोक जास्त पसंत करतात. शो च्या पहिल्या दिवसापासूनच ती चर्चेत आहे. सुरुवातीच्या दिवसात विकास सोबत झालेल्या तूतूमैमै वरुन शिल्पा चर्चेत आली. आता दोघांमध्ये झालेल्या मैत्रीनंतर थोडी कमी दिसू लागली.

पण विकास सोबतच्या मैत्रीमूळे आकाश आणि तिच्या मैत्रीत दुरावा आला.

न पाहिलेला व्हिडिओ

बिग बॉसचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये शिल्पा, विकास आणि पुनीष गप्पा मारत आहेत. त्यावेळी आपले खाण्यावर किती प्रेम आहे हे शिल्पा समजावून सांगत आहे.

दरम्यान ती सोफ्याचा आधार घेऊन उभी राहून बोलत असताना पाठच्या बाजूला पडते. त्यावेळी ती माझा स्कर्ट, माझा स्कर्ट असे ओरडू लागते.

इज्जत वाचविल्याबद्दल धन्यवाद

तेव्हा पुनीष उभा राहतो आणि तिचा स्कर्ट संभाळतो. त्यानंतर शिल्पाने आपला स्कर्ट ठिक करत 'माझी इज्जत वाचविल्या बद्दल धन्यवाद.' असे दोघांना म्हटले. 

त्यानंतर ती राहिलेली चर्चा पूर्ण करु लागते.