व्हिडिओ : अशी असते 'चला हवा...'च्या टीमची दिवाळी!

गेली तीन वर्ष प्रेक्षकांना आपल्या पंचेसनं खिदळायला लावणारी 'चला हवा येऊ द्या'ची टीम दिवाळी निमित्तानं खास झी २४ तासवर आपले अनुभव शेअर करतेय.

Updated: Oct 21, 2017, 08:21 PM IST
व्हिडिओ : अशी असते 'चला हवा...'च्या टीमची दिवाळी! title=

मुंबई : गेली तीन वर्ष प्रेक्षकांना आपल्या पंचेसनं खिदळायला लावणारी 'चला हवा येऊ द्या'ची टीम दिवाळी निमित्तानं खास झी २४ तासवर आपले अनुभव शेअर करतेय.

स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते शूटिंग करून एडीट करण्यापर्यंत सगळ्या कामात या टीमचं खास लक्ष असतं... याच टीमचा भाग असणारे कलाकार डॉ. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांनी आपली यंदाच्या दिवाळीबद्दल झी २४ तासच्या टीमशी गप्पा मारल्या. 

याच निमित्तानं गेल्या तीन वर्षांत अनवाधानानं कुणाचं मन दुखावलं गेलं असलं तर त्यांची माफीदेखील श्रेयानं आपल्या सगळ्या टीमतर्फे मागितलीय... 

दिवाळीत ही टीम कशी मज्जा-मस्ती करते, ते ऐकूयात त्यांच्याच शब्दात...