विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह' चित्रपटाची तारिख निश्चित

चित्रपटातील विकीचा फर्स्ट लूक व्हायरल

Updated: Jun 17, 2019, 07:48 PM IST
विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह' चित्रपटाची तारिख निश्चित title=

मुंबई : 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'सारख्या सुपटहिट चित्रपटानंतर आता अभिनेता विकी कौशल 'सरदार उधम सिंह' या बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सरदार उधम सिंह'मधील विकीचा फर्स्ट क्लिन शेव्ड लूक प्रसिद्ध झाल्यानंतर विकीच्या चाहत्यांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

'सरदार उधम सिंह' चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. पुढच्या वर्षी २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शूजित सरकार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात विकी उधम सिंह यांची भूमिका साकारत आहे. 

 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

रोनी लाहिरी आणि शील कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. उधम सिंह यांनी डायर यांची इंग्लंडला जाऊन हत्या केली होती. जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये क्रांतीकारी उधम सिंह यांनी घेतलेल्या बदल्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.