विक्की कौशल पुन्हा दिसणार 'आर्मी' लूकमध्ये, चाहत्यांसाठी सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर

 विक्कीला 'उरी' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. या चित्रपटात विक्कीने आर्मी ऑफिसर म्हणून काम केले. बुद्धीमान आणि धाडसी ऑफिसर आशा भूमिकेत तो प्रेक्षकांच्या भेटीस आला.

Updated: Apr 3, 2021, 05:03 PM IST
विक्की कौशल पुन्हा दिसणार 'आर्मी' लूकमध्ये, चाहत्यांसाठी सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर title=

मुंबई : अभिनेता विक्की कौशल आज प्रत्येकाच्या हृदयात राज्य करत आहे. विक्कीचे चाहते अजूनही 'उरी' चित्रपटामुळे त्याच्यावर खूप प्रेम करतात. विक्कीला 'उरी' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. या चित्रपटात विक्कीने आर्मी ऑफिसर म्हणून काम केले. बुद्धीमान आणि धाडसी ऑफिसर आशा भूमिकेत तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याचा आर्मी लूक लोकांनी खूप पसंत देखील केला. तसेच त्याने 'राजी'या चित्रपटात देखील पाकिस्तानी आर्मी ऑफिसर म्हणून काम केले आहे.

विक्की आर्मी लूक मध्ये खरोखरच खूप शोभून दिसतो, आणि त्या भूमिकेला तो चांगला न्याय देतो. त्यामुळे आता विकी पुन्हा एकदा आर्मी ऑफिसर भुमिकेत प्रेक्षकांच्या समोर योणार आहे.

देशाचे महान योद्धा सॅम मानेकशॉ ( Sam Manekshaw) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकचे नाव जाहीर करण्यात आले. यामध्ये विक्की कौशल मुख्य भूमिकेत म्हणजेच सॅम मानेकशॉ च्या भूमिकेत दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि मेघना गुलजार यांनी या बायोपिकला ‘सॅम बहादूर’ असे नाव दिले आहे.

सॅम हे भारतातील एक महान योद्धे होते. या चित्रपटात विक्की कौशल सॅम मानेकशॉ यांच्या भुमिकेत दिसणार आहे. ‘साम बहादूर’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

विक्की कौशलने या चित्रपटाविषयी माहिती देणारा टाइटल  व्हीडिओ आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या चित्रपटातील त्याचा लूक विक्कीने आधीच आपल्या चाहत्यांसमोर आणला होता. विक्कीच्या त्या वेगळ्या लूकने सर्वांना त्याच्याकडे आकर्षित केले आहे. यामध्ये तो खरोखरच खूप वेगळा आणि आकर्षक दिसत आहे.

या  व्हीडिओमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे दृश्ये दाखवले गेले आहेत. तसेच या व्हीडिओच्या पाठी एक आवाज ऐकू येत आहे, त्यामध्ये  सांगण्यात आले आहे की, "बरीच नावे घेतली गेली आहेत, परंतु एका नावाने ते आमचे झाले." या व्हीडिओवर विकीने असे लिहिले की, "मनुष्य | कथा | शूर हृदय, आमचे सॅम ... फिल्ड मार्शल #यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कथेला # सॅमबहादूर हे नाव सापडले आहे."