शत्रुघ्न सिन्हा यांचं Kamala Harris यांच्याशी अनोखं नातं; कसं ते पाहा....

एक लक्षवेधी नाव म्हणजे कमला हॅरिस Kamala Harris  याचं. 

Updated: Nov 9, 2020, 08:20 AM IST
शत्रुघ्न सिन्हा यांचं Kamala Harris यांच्याशी अनोखं नातं; कसं ते पाहा....  title=
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या America अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचे निकाल अखेर समोर आले. साऱ्या विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या चेहऱ्यांचीही बरीच चर्चा झाली. इतकंच नव्हे, तर या व्यक्तींना घवघवीत यशही मिळालं. त्यातीलच एक लक्षवेधी नाव म्हणजे कमला हॅरिस Kamala Harris  याचं. 

महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवड झालेल्या कमला हॅरिस यांच्याशी एका बॉलिवूड अभिनेत्याचे कौटुंबीक संबंध आहेत हे स्पष्ट होत आहे.
 
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीच याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी ट्विट करत हॅरिस यांच्याशी असणारं एक अनोखं नातं समोर आणलं. 

सिन्हा यांच्या मोठ्या भावाची मुलगी प्रीता ही अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, यांच्या जवळची आहे, असं सांगत त्यांनी प्रीतासोबतचा एक फोटोही शेअर केला. 

 

जो बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिन्हा यांनी त्यांचे आभार मानले. सोबतच त्यांनी हॅरिस यांचा विजयही अधोरेखित केला. 

आपली पुतणी ही या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी झाली होती असं म्हणत त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यानंतर हे अनोखं कनेक्शन जाणून नेटकऱ्यांमध्य़े याबाबतच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं.