मुंबई : जग खूप बदललं.. छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोट होऊ लागलेत. एकमेकांना समजून घेण्याचा विचार आजच्या लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये नाही. संसारातील तडजोड जिथे फक्त मी एकट्यानेच का करू? असा सवाल प्रत्येकजण एकमेकांना विचारू लागले. तिथेच एक स्त्री अशी आहे जिने आपल्यासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. सत्यवान आणि सावित्रीची कथा ही फक्त पुराणातच घडली असं नाही. आजही या 21 व्या शतकात सावित्री आहेत. ज्या आपल्या सत्यवानासाठी अहोरात्र झटत आहेत. अशीच ही गोष्ट आहे आताच्या आधुनिक सावित्रीची....
ही सावित्री आहे पूजा त्रिंबककर. बुधवारी वटपौर्णिमा हा सण आहे. जंग फूड्सच्या काळातही स्त्रिया नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी वडाभोवती सात फेऱ्या मारतात. हाच नवरा जन्मोजन्मी लाभो म्हणून उपवास करतात. अशीच एक सावित्री आहे जी गेली 8 वर्षे आपल्या पॅरलाइज झालेल्या नवऱ्याला खंबीरपणे साध देत आहे. होम मिनिस्टरच्या 'वटपौर्णिमा स्पेशल' या भागात बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या या आताच्या आधुनिक सावित्रीला भेटणार आहोत.
भावाच्या अकाली जाण्याने धक्का घेतलेल्या नवऱ्याला तिने आतापर्यंत खूप चांगली साथ दिली. गेली 8 वर्षे पॅरलाइज झालेला नवरा 5 वर्षांपासून बेडरिटन आहे. पण ही सावित्री या सत्यवानासोबत खंबीरपणे उभी आहे. आतापर्यंत या दोघांच्या संसाराला 20 वर्षे झाली. 20 वर्षापूर्वी नवऱ्याने दिलेले गिफ्ट पूजा यांनी खूप सांभाळून ठेवलं आहे. नवऱ्याने प्रपोझ करण्यासाठी जी चिठ्ठी पाठवली ती देखील पूजा यांनी जपून ठेवली आहे. नवऱ्याच्या या अवस्थेतही पूजा यांनी नवऱ्याला आनंद देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे.