वरूण तू असं करू शकतोस विश्वासचं बसत नाही - कृती सेनन

वरूण धवन कायम त्याची भूमिका योग्य रितीने निभावतो. 

Updated: Apr 18, 2021, 03:28 PM IST
वरूण तू असं करू शकतोस विश्वासचं बसत नाही - कृती सेनन title=

मुंबई : अभिनेता वरूण धवन कायम त्याची भूमिका योग्य रितीने निभावतो. करूनने त्याच्या करियरमध्ये रोमांटिक, कॉमेडी, एक्शन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचे काही चित्रपट हिट ठरले, तर काही चित्रपटांना मात्र अपयशाचा सामना करावा लागला. वरून सध्या त्याचा आगामी 'भेडिया' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'भेडिया' चित्रपटात तो अभिनेत्री कृती सेननसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण अरूणाचल प्रदेशमध्ये सुरू आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरूण एका खास व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ कृतीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी तिच्या वडिलांसोबत वरूनला भेटण्यासाठी आली. भेटीमागचं कारण म्हणजे तेव्हा त्या चिमूकलीचा वाढदिवस होता. वरूणने केक कापला पण त्या मुलीला न भरवता तिच्या वडिलांना भरवला. तेव्हा त्या चिमूकलीच्या चेहऱ्यावरील भाव पाहाण्या सारखे आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

कृतीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'वरूण तू असं करू शकतोस विश्वासचं बसत नाही..' असं कृतीने लिहिलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कृती व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातचं वरूणने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे.