मुंबई : गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा अक्टूबर सिनेमा प्रदर्शित झाला. सुजीत सरकार दिग्दर्शित अक्टूबर सिनेमाचे समीक्षकांनी जोरदार कौतुक केले. उत्तम कथा, परफेक्ट स्टारकास्ट आणि चांगले दिग्दर्शन असूनही बॉक्स ऑफिसवर सिनेमा फार कमाल करु शकला नाही. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ४ दिवसांनंतरही सिनेमा चांगली कामगिरी करु शकला नाही.
आतापर्यंतची कमाई ट्रेड अनालिस्ट तरण आदर्शने शेअर केली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी सिनेमाने २.७० कोटींची कमाई केली. तरण आदर्शने ट्विटर अकाऊंटवर कमाई लिहिताना सांगितले की, पहिल्या दिवशी सिनेमाने ५.०४ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ७.४७ कोटी कमावले. चौथ्या दिवशी सिनेमाने २.७० कोटी कमाई करत एकूण २२.९५ कोटीचा पल्ला गाठला.
#October Fri 5.04 cr, Sat 7.47 cr, Sun 7.74 cr, Mon 2.70 cr. Total: 22.95 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2018
सिनेमाने कमाई कमी केली असली तरी यात वरुण धवनने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी वेगळी भूमिका साकारली आहे.