गोविंदा- करिष्माच्या ब्लॉ़कबस्टर रिमेकमध्ये झळकणार ही जोडी

कुणामुळे पुन्हा अनुभवता येणार ही मज्जा 

गोविंदा- करिष्माच्या ब्लॉ़कबस्टर रिमेकमध्ये झळकणार ही जोडी  title=

मुंबई : वरूण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भरपूर आनंद द्यायला सज्ज झाली आहे. हा सिनेमा कुणा दुसऱ्याचा नसून वरूण धवनचे वडिल दिग्दर्शक डेविड धवन यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'कुली नंबर 1'चा रिमेक घेऊन येणार आहेत. 

सलमान खान आणि गोविंदाच्या सुपरहिट सिनेमाच्या रिमेककरता कितीही मेहनत करा ती प्रेक्षकांची पहिली पसंत बनणार नाही. मात्र या सिक्वलकरता वरूण धवन उत्तम अभिनेता असल्याचं म्हटलं आहे. 

या सिनेमात वरूण धवनच्या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट यांना कास्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, 'कुली नंबर 1' च्या रिमेकमध्ये वरूण धवन आणि सारा अली खानला साइन केल्याची चर्चा होती. पण अखेर आलिया भट्टचं नाव नक्की झालं आहे. 

आज नुकताच आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या 'गली बॉय' या सिनेमाचं एक गाणं देखील रिलीज झालं आहे. 2019 मध्ये आलिया भट्ट रणवीर सिंहसोबत 'गल्ली बॉय' आणि रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' या सिनेमात दिसणार आहे. 

2018 हे वर्ष आलियासाठी खूप खास होतं. 'राझी' या सिनेमाची खूप चर्चा झाली असून तिचं खासगी आयुष्य देखील खूप चर्चेत होतं. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याला आता सगळ्यांकडूनच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे दोघं कधी विवाहबंधनात अडकतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे. 

गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रिमेक म्हटला तर सगळ्याच चाहत्यांच्या नजरा या सिनेमाकडे असणार आहेत. तसेच आलिया आणि वरूण ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.