'चला हवा येऊ द्या'मधील या व्यक्तीचा साखरपुडा

कुणाशी केला साखरपुडा 

'चला हवा येऊ द्या'मधील या व्यक्तीचा साखरपुडा  title=

मुंबई : मराठी मालिकांमध्ये सध्या लग्नसराई पाहायला मिळत असतानाच मालिकेतील कलाकार देखील लग्नबंधनाच्या बेडीत अडकण्यास सज्ज झाले आहेत. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील एक कलाकाराचा साखरपुडा संपन्न झाला आहे. अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. 31 डिसेंबर 2018 रोजी अगदी वर्ष संपताना अंकुरने साखरपुडा झाला आहे. 

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात डॉ निलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे,  श्रेया बुगडे आणि अंकुर वाढवे हे कलाकार असून त्यांची चांगली जोडीच जमली आहे. 

थुकरटवाडीत आता वेगवेगळी कला सादर झाली. यामध्ये बाकीच्या कलाकारांप्रमाणे अंकुरने देखील आपल्या सर्वांना मनमुराद हसवलं आहे. अप्सरा आली या कार्यक्रमाच्या वेळी अंकुरने अप्सरा सोनाली कुलकर्णीची भूमिका साकारली होती. तसेच सैराटच्या स्पेशल एपिसोडमध्ये रिंकु राजगुरूची भूमिका साकारली होती. 

अंकुरने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण हा साखरपुडा कुणाशी केला याची अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. तसेच यांच लग्न कधी होणार याची देखील काही माहिती समोर आलेली नाही. 

प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.