वरुण धवननं लेकीच्या जन्मानंतर केली पहिली पोस्ट, 'हरे राम, हरे कृष्ण' लिहत शेअर केला 16 सेकंदाचा क्यूट व्हिडीओ

Varun Dhawan's First Post After Daughters Birth : वरुण धवननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट पाहताच चाहत्यांना झाला आनंद... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 4, 2024, 11:38 AM IST
वरुण धवननं लेकीच्या जन्मानंतर केली पहिली पोस्ट, 'हरे राम, हरे कृष्ण' लिहत शेअर केला 16 सेकंदाचा क्यूट व्हिडीओ title=
(Photo Credit : Social Media)

Varun Dhawan's First Post After Daughters Birth : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरी एका परीचे आगमन झाले आहे. काल 3 जून रोजी नताशानं त्यांच्या मुलीला जन्म दिला. त्यांना सगळेच शुभेच्छा देताना दिसत आहेत. सगळ्यात आधी वरुण धवनचे वडील डेविड धवन यांनी या बातमीला दुजोरा दिला. त्यानंतर चित्रपटसृष्टीपासून चाहत्यांपर्यंत सगळेच वरुण आणि नताशाला शुभेच्छा देत आहेत. आता अखेर वरुण धवननं त्याच्या आयुष्यात आलेली ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लेकीच्या वाढदिवसानंतर वरुणनं पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. 

आज 4 जून रोजी वरुण धवननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याला मुलगी झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यानं एक छोटा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत वरुणनं कॅप्शन दिलं की आमच्या बाळाचा जन्म झाला आहे. तुमच्या सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभारी आहोत. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वरुण धवनला काल मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातून बाहेर येताना एका व्हायरल व्हिडीओत दिसले. त्यात वरुण त्याचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत जाताना दिसतोय. त्यात तो त्याच्या लग्झरी कार जवळ जाताना दिसतोय. तर त्या व्हिडीओत वरुण धवन आणि डेव्हिड धवन यांच्या चेहऱ्यावर असलेली आनंद दिसतोय. तर पापाराझींना त्यांना शुभेच्छा देताच त्यांच्या चेहरऱ्यावर असलेला आनंद दिसतोय. 

हेही वाचा : तमिळ व्यक्तीनं भारतावर शासन का करु नये? कमल हासन यांचं मोठं विधान

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी वरुण धवन आणि नताशानं प्रेग्नेंसीची घोषणा केली. त्यांनी एक फोचो शेअर केला होता. त्याच वरुण हा नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसतोय. याला शेअर करत त्यांनी लिहिलं की आम्ही प्रेग्नंट आहोत. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. तर त्यावेळी देखील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या.