"आलिया भट्ट माझ्यासाठी...", Varun Dhawan नं कॉफी विथ करण 7 मध्ये स्पष्टच सांगितलं

वरुण धवन, बॉलिवूडच्या नवीन पिढीचा पोस्टर बॉय असून 100 कोटींच्या क्लबमध्ये असलेल्या तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे.

Updated: Sep 13, 2022, 01:53 PM IST
"आलिया भट्ट माझ्यासाठी...", Varun Dhawan नं कॉफी विथ करण 7 मध्ये स्पष्टच सांगितलं title=

Koffee With Karan 7: करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 या कार्यक्रमाची मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चा आहे. एका पाठोपाठ एक बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात या कार्यक्रमाची रंगत वाढतच चालली आहे. कॉफी विथ करण (Koffee With Karan 7) या कार्यक्रमाचे आतापर्यंत 11 भाग झाले आहेत. नुकतंच या कार्यक्रमात वरुण धवन (Varun Dhawan) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) या जोडीने हजेरी लावली. यावेळी करण जोहरनं नेहमीप्रमाणे या पाहुण्यांना बोलतं केलं. यावेळी दोन्ही पाहुण्यांनी करण जोहरच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी करण जोहरने वरुण धवनला त्याच्या प्रतिस्पर्ध्याबाबत विचारलं. तेव्हा वरुण धवननं दिलेल्या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

वरुण धवन, बॉलिवूडच्या नवीन पिढीचा पोस्टर बॉय असून 100 कोटींच्या क्लबमध्ये असलेल्या तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे. यावेळी वरुण धवननं सांगितलं की, “मला एकच व्यक्ती स्पर्धात्मक वाटते, ती म्हणजे आलिया भट्ट. आपण स्वीकारलं पाहिजे की, महिलासुद्धा नायकांपेक्षा मोठ्या असू शकतात. आलिया भट्टची कारकिर्द पाहता एक पुरुष अभिनेता म्हणून, मी तिच्याकडून प्रेरणा घेतो आणि एक कलाकार म्हणूनही ते करण्याची इच्छा आहे.”

वरुण धवन नुकताच JugJugg Jeeya चित्रपटात अभिनेता अनिल कपूर, कियारा अडवाणी, नीतू कपूर, मनिष पॉल आणि प्राजक्ता कोळीसह दिसला होता. वरुण धवन आगामी चित्रपटांबाबत प्रचंड उत्सुक आहे. बवाल या चित्रपटात तो जान्हवी कपूर आणि भेडिया या चित्रपटात तो क्रिती सेननसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.