कर्करोग ग्रस्त मुलांसोबत वरूणने धरला ठेका

वरूणचा दिलखुलास अंदाज

Updated: Dec 16, 2019, 07:28 PM IST
कर्करोग ग्रस्त मुलांसोबत वरूणने धरला ठेका title=

मुंबई : अभिनेता वरूण धवन लवकरच 'स्ट्रीट डान्सर ३ डी' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात चांगलाच व्यस्त आहे. परंतु आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्याने कर्करोगासोबत झुंज करणाऱ्या मुलांसोबत ताल धरला आहे. 'बंदुककी गोली..' या गाण्याच्या बोलांवर तो थिरकताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"Baaki Sab First Class Hain#VarunDhawan joins Hope 2019 to spread the message - Childhood Cancer is Curable, performs with the kids and doctors @varundvn

 

त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. त्याचा हा दिलखुलास अंदाज चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे. मुलांना होणारा कर्करोग आता असाध्य नाही. हाच संदेश देण्यासाठी तो 'होप २०१९' या कार्यक्रमात उपस्थित होता. 

यादरम्यान मुलांनी देखील वरूणसोबत भरभरून आनंद साजरा केला. वरूणचा आगामी चित्रपट 'एबीसीडी'चा तिसरा भाग आहे. चित्रपटाच्या दोन भागांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. नृत्याच्या बाबतीत असणारी ओढ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

'स्ट्रीट डान्सर 3 डी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर आहे. २० जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 'स्ट्रीट डान्सर' शिवाय तो 'कुली नं १' चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनेत्री सारा अली खान सोबत झळकणार आहे.