मुंबई : आता अनेक बॉलिवूड कलाकार हे हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांना पसंती देतात. एकीकडे हिंदी चित्रपटांना मागे टाकत दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहेत. अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम मिळत आहे. राजकुमार रावनंही (Rajkumar Rao) दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जान्हवी कपूरनं (Janhvi Kapoor) एक तेलगू चित्रपट साइन केला आहे. दरम्यान, आता अभिनेता वरुण धवननेही (Varun Dhawan) दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा व्यक्ती केली आहे. मात्र, त्यानं केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
हेही वाचा : Alia Bhatt Daughter : रक्ताचं नातं नसूनही आलियाला वडिलांची माया देणाऱ्या खास व्यक्तीची Emotional Post
वरुण सध्या त्याचा 'भेडिया' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. वरुण 'भेडिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच एका मुलाखतीत हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटाच्या तुलना करण्यास सांगता वरुणनं दिलेल्या वक्तव्यानं सगळ्यांना धक्काबसला आहे. 'Hindi films are getting their a**** kicked.' वरुणनं केलेल्या या धक्कादायक वक्तव्यानं सगळ्यांना धक्काबसला आहे. याशिवाय वरुणला आता दाक्षिणेतील बड्या निर्मात्यांसोबत काम करायचं आहे. या निर्मात्यांच्या यादीत एसएस राजामौली, लोकेश कनागारा आणि एस. शंकर यांचा समावेश आहे. एका मीडिया इव्हेंटमध्ये भाग घेताना वरुण म्हणाला की, 'हिंदी चित्रपटसृष्टीने दक्षिणेकडील चित्रपटांपासून प्रेरित होऊन तसंच केलं पाहिजे. 'कांतारा' आणि 'केजीएफ' सारखे चित्रपट आम्हाला चांगल काम करण्यास प्रेरित करतात.'
वरुण म्हणाला की, 'जर हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत तर या चित्रपटांसारखे चित्रपट का बनवत नाहीत आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबत मिळून काम करा. मला माहित आहे की आता यावर बोलणं खूप कठीण आहे. कारण Hindi films are getting their a**** kicked. मला नेहमीच तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम करायचे होते. मला आनंद आहे की, भेडिया हिंदीसह या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.' (varun dhawan comment on bollywood films and south movies bhediya coming horror comedy )
वरुण पुढे म्हणाला की, 'बॉलिवूड कलाकारांना दक्षिणेत खूप प्रेम मिळतं. KGF 2 मध्ये रवीना टंडन आणि संजय दत्त देखील होते हे आपण कसं विसरू शकतो. लोक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही एकत्र येऊन एकत्र चित्रपट बनवण्याची ही चांगली वेळ आहे.'