Vanita Kharat च्या लग्नात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', मंडपातील आनंदाचे क्षण Viral

Vanita Kharat Wedding : वनिता खरातच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील Gaurav More आणि Prithvik Pratap यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Updated: Feb 3, 2023, 11:43 AM IST
Vanita Kharat च्या लग्नात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', मंडपातील आनंदाचे क्षण Viral title=

Vanita Kharat Wedding Photo and Video : सध्या सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे आपण पाहतोय. नुकतंच अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul) लग्नबंधनात अडकले आहेत. तर त्यानंतर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) नं देखील सप्तपदी घेतल्या आहेत. काल म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी वनिता आणि सुमित लोंढे लग्न बंधनात अडकले आहेत. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या सहकलाकारांनी देखील हजेरी लावली होती. वनिताच्या लग्नाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत वनिताला तिच्या सहकलाकारांनी उचलून घेतलं आहे. 

वनिताच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तिचे सहकलाकार आणि मित्र गौरव मोरे (Gaurav More) आणि पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) दिसत आहे. वनिताचा नवरा सुमित लोंढे याला त्याच्या मित्रांनी उचलून घेतल्यानंतर वनिताला देखील तिच्या मित्रांनी उचलून घेतलं आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इतकंच काय तर वनितानं तिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत डान्सही केला आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज आणि पैठणी शेला असा मराठमोळा लूक केला होता. तर सुमितने शेरवानी आणि फेटा बांधत शाही लूक केला होता. त्यानंतर या दोघांनी रिसेप्शनला साडी आणि ब्लेझर असा वेस्टर्न लूक केला होता. यावेळी वनिताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर सुमीत हा निळ्या रंगाच्या सूट-बुटात पाहायला मिळाला.

हेही वाचा : Vanita Kharat च्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

यावेळी या कलाकारांनी ‘बनो रे बनो मेरी चली ससुराल’, ‘नवराई माझी लाडाची’ आणि ‘मुड़ के ना देखो दिलबरो’ या गाण्यांवर डान्स केला. याचे व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या कलाकारांचा हा डान्स पाहून वनिताच्या डोळ्यात पाणी आले. यावेळी ती रडतानाही पाहायला मिळाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही महिन्यांपूर्वीच वनिताने ती प्रेमात असल्याची कबुली दिली होती. ती आणि सुमित लोंढे रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच ते लग्न देखील करणार आहे. वनिता आणि सुमित यांनी दिवाळी आणि नवीन वर्ष एकत्रच साजरे केलं होतं. याचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. 'सरला एक कोटी' (Sarala Ek coti) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्चला आलेल्या वनिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाची तारीख सांगितली होती. 2 फेब्रुवारी रोजी सप्तपदी घेत असल्याचे वनितानं सांगितले होते.  वनिताने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे.