Vandana Gupte in Khupte Tithe Gupte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि चक्क या चित्रपटाला प्रेक्षकांचा उचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं 'सैराट' आणि 'वेड' या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत कोट्यवधींचा गल्ला भरला आहे. सुरूवातीच्या काहीच आठवड्यात या चित्रपटानं चक्क 50 कोटी रूपयांची उलाढाल केली. बॉक्स ऑफिसवर असे यशस्वी आकाडे गाठल्यानंतर या चित्रपटानं आत्तापर्यंत 80 कोटींच्याही वर पैसे कमावले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. 100 कोटीच्या क्लबमध्ये जाण्यासाठी या चित्रपटाला आता काहीच आकाडे कमी पडत आहेत. तेव्हा यावर्षीचा 'बाईपण भारी देवा' हा सर्वाधिक हीट ठरलेला सिनेमा आहे. सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगणी, दिपा चौधरी, सुचित्रा बांदेकर यांच्या अभिनयानं हा चित्रपट बराच गाजला होता. त्यामुळे सध्या या सर्वांचीच चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
सध्या 'झी मराठी' वाहिनीवर 'खुपते तिथे गुप्ते' हा अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रमही सध्या जोरात सुरू आहे. या मंचावरून आत्तापर्यंत अनेक कलाकार आणि राजकारण्यांनी हजेरी लावली आहे. तेव्हा हा कार्यक्रम सध्या टेलिव्हिजनवर जोरात सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे काही प्रोमोज बाहेर आले आहेत. सध्या या कार्यक्रमातील वंदना गुप्ते यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतो आहे. त्यांच्या लग्नाला 50 वर्षे पुर्ण झाली आहेत आणि सोबतच यावेळी त्यांनी आपली लव्ह स्टोरी शेअर करताना आपल्या सासुबाईंचा एक किस्सा सांगितल्याचे व्हिडीओतून कळते आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की हा गमतीशीर किस्सा नक्की होता तरी काय?
हेही वाचा - जगातील सर्वात महागडी Water Bottle; आता पाणी प्यावं की बाटली तिजोरी ठेवावी हे किंमत पाहूनच ठरवा
यावेळी अवधूत गुप्ते यांनी वंदना गुप्ते यांना प्रश्न विचारला की नवऱ्यानं प्रपोज कसं केलं होतं? सोबतच सासूबाईंना भेटायला गेल्यावर पहिल्यांदा काय घडलं? तेव्हा काय विचारणा झाली? तेव्हा त्या म्हणाल्या की, ''
“मला शिरीषनं प्रपोज केला होतं. त्यानंतर मी माझ्या सासू-सासऱ्यांना पहिल्यांदा भेटायला गेले होते. त्यावेळी मला माझ्या आईने 'असं वागं, वाकून नमस्कार कर, जोरजोरात हसू नको, बोलू नको', अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. माझे सासू-सासरे माझ्या आईच्या (माणिक वर्मा) गाण्याचे भक्त होते. त्यांच्या घरी आईचं गाणं लागल्याशिवाय सुरूवात व्हायचीच नाही. 'माणिक बाईंची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येणार, असं आपला मुलगा म्हणतो. खरंच ती येतेय का बघूया', यासाठी सासूबाईंना मला भेटायला बोलवलं.''
''आईच्या गाण्याचे ते दोघेही भक्त होते. त्यांनी मला गातेस का? असा प्रश्न विचारला होता. मी हो म्हटलं. त्यावर त्यांनी मला जरा गाणं म्हणून दाखवं असे सांगितले. मी त्यावेळी ‘पाडाला पिकला आंबा’ हे गाणं त्यांच्यासमोर गायला सुरूवात केली. त्यात ‘नीट बघा’ हे बोलताना मी सासऱ्यांकडे हात दाखवला. यावेळी माझा नवरा बाजूला बसला होता. ते ऐकल्यानंतर माझ्या नवऱ्याने मान खाली घातली. ती लग्नाला 50 वर्ष झाल्यानंतर अजून वर काढलेली नाही”, असा रंजक किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.