Vandana Gupte: यावर्षी सर्वात जास्त कुठला चित्रपट गाजला असेल तर तो म्हणजे आपल्या मराठीतला 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट. या चित्रपटानं अक्षरक्ष: इतिहास निर्माण केला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटातील सर्वच मातब्बर अभिनेत्रींच्या अभिनयानं हा चित्रपट यशाचे शिखर गाठतो आहे. त्यामुळे हा यशाची चव राखत या संपुर्ण टीमनं नुकतीच एक धमाल सेलिब्रेशन पार्टी केली आहे. यावेळी वंदना गुप्ते यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच गाजते आहे. यावेळी या सर्वच अभिनेत्रींचे नवरेही उपस्थित होते आणि सोबतच कुटुंबीयही आले होते. सर्वांनी यावेळी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि सोबतच अनेकांनी आपले अनुभव सांगितले. आपल्याला आलेल्या अनुभवांबद्दलही कलाकारांनी कमेंट्स केल्या होत्या. यावेळी वंदना गुप्तेंच्या एका वक्तव्यांनं सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.
सध्या या चित्रपटाचे अगदी हाऊसफुल शो सुरू आहेत. प्रेक्षक पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहायला जात आहेत. सोबतच या चित्रपटातील गाणीही सर्वत्र फेमस झाली आहे. या चित्रपटातील 'मंगळागौर' हे गाणंही तुफान फेमस झालं आहे. या चित्रपटातील वेशभुषाही खूप गाजते आहे. यावेळी या सेलिब्रेशन पार्टीमध्ये सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सर्वांनाच गहिवरून आलं आहे. त्यामुळे यावेळी प्रत्येकांना आपले अनुभव सांगतात भरून आले आहे. इतके मोठे यश हे कुणालाच अपेक्षित नव्हते. लॉकडाऊनच्या आधी या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर गेली तीन वर्षे वाट पाहिल्यानंतर हा चित्रपट पुर्णत: यशस्वी झाला आहे. त्यामुळे सर्वांसाठीच सब्र का फल मीठा होता हैं अशी भावना आहे.
हेही वाचा - ब्राह्मण असून मांसाहार करता? सुकन्या मोनेंचे ट्रोलरला सडेतोड उत्तर
यावेळी वंदना गु्प्ते यांचे वक्तव्य गाजते आहे. सर्वांनाच या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया विचारल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाच्या यशावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी वंदना गुप्ते म्हणाल्या की, ''बाईपण भारी देवा चित्रपटाला बायकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्या खूप उत्साहाने हा चित्रपट बघायला येतात. आम्हाला बघितल्यानंतर त्यांचा उत्साह द्विगुणीत होते. त्या ओरडायला लागतात. हे बघून आम्ही धन्य होतो. आम्हाला आता वाटू लागलं आहे आम्ही सुपरस्टार झाले आहोत. शाहरुख आणि सलामान खानलाही आम्ही मागे टाकलं आहे.''
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी साकारलेल्या सहा बहिणींची गोष्ट ही प्रेक्षकांना चांगलीच रूचली आहे. महिलांप्रमाणे या चित्रपटाला तरूणाई आणि पुरूषवर्गही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.