दुसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद विरूष्काची लेक; पाहा वामिकाचा नवा क्यूट फोटो

कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी विरूष्काची लेक दुसऱ्यांदा समोर आली  

Updated: Jun 13, 2023, 08:14 PM IST
दुसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद विरूष्काची लेक; पाहा वामिकाचा नवा क्यूट फोटो title=

विजय सुर्वे, झी मीडिया,  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीची मुलगी वामिका कोहली जन्मल्यापासूनच चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून वामिका कोहलीचा चेहरा जगाने पाहिला नव्हता, पण एका सामन्यादरम्यान वामिका कोहली वडिलांना हात दाखवताना दिसली होती. हा फोटो समोर आल्यानंतर विराट आणि अनुष्काने हे फोटो सर्वत्र हटवण्यास सांगितले. 

मात्र आता पुन्हा एकदा वामिका कोहलीचा चेहरा सर्वांसमोर आला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. सध्या वामिकाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

विराट आणि अनुष्काचे हे फोटो एअरपोर्टचे सांगितले जात आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. वामिका कोहलीचा नवा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या फोटोबाबत विराट आणि अनुष्काचे कोणतेही वक्तव्य अद्याप आलेले नाही.

वामिकाचे फोटो क्लिक आणि प्रिंट करु नका... 
लेकिचे मैदानात टीपले गेलेले फोटो पाहता, अनुष्कानं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन करत तिचे फोटो क्लिक करु नये, तसंच प्रिंट अथवा प्रसिद्धही करु नये असं सांगितलं होत. 

पण आता दुसऱ्यांदा वामिकाचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वामिका प्रचंड क्यूट दिसत आहे. एवढंच नाही तर वामिका वडिलांसारखीचं दिसते.. असं देखील अनेक चाहते म्हणत आहे.