वैदेही परशुरामीच्या 'एक दोन तीन चार' चा धमाकेदार टिजर रिलीज...

Vaidehi Parshurami's Ek Don Tin Chaar movie teaser :  वैदेही परशुरामीच्या 'एक दोन तीन चार' या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 24, 2023, 11:40 AM IST
वैदेही परशुरामीच्या 'एक दोन तीन चार' चा धमाकेदार टिजर रिलीज...  title=
(Photo Credit : Stills)

Vaidehi Parshurami's Ek Don Tin Chaar movie teaser : जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला 'एक दोन तीन चार' हा चित्रपट येत्या नवीन वर्षात 5 जानेवारी 2024 रोजी आपल्या भेटीस येत आहे. जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित 'झिम्मा 2’ आज प्रदर्शित होत आहे. या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच 'एक दोन तीन चार' चित्रपटाचा धमाकेदार टिजर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्कीच.

या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांचा हा पुढील चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत. 

हेही वाचा : 75 वर्षांच्या हेमा मालिनी मीराबाईंच्या रुपात समोर येताच, त्यांना पाहून पंतप्रधान मोदी झाले अचंबित

जिओ स्टुडिओजच्या या नव्या चित्रपटात कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे. चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिनं साकारली आहे. तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे. 

जिओ स्टुडिओज बरोबर या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांनी केली आहे. आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीनं या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टोडिओजची ही नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.