मुंबई: महाराष्ट्रातील लोक आणि संस्कृती जगभरात पसरली आहे, अशी वाक्ये अनेकदा आपल्या कानावर पडत असतात. परदेशात राहणाऱ्या हौशी मराठी नागरिकांकडून त्याठिकाणीही मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या जयंतीवेळी या सगळ्याचा वेगळ्याच पद्धतीने प्रत्यय आला. यासाठी निमित्त ठरले ते अमेरिकन दुतावासातील अधिकारी. या अधिकाऱ्यांनी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त एक खास व्हीडिओ तयार केला आहे. या व्हीडिओत अमेरिकन अधिकारी लोकप्रिय मराठी चित्रपटांमधील संवाद बोलताना दिसत आहे. त्यांचा हा मराठी बाणा पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये जेन, निक, लीन आणि रॉब या अमेरिकन अधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे मराठी भाषेतील संवाद म्हटलेत ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्थानिक संस्कृतीशी समरस होण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचेही अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
On Dadasaheb Phalke’s birth anniversary, here’s our tribute to Marathi cinema… Watch, vote, and celebrate #MaharashtraDay with us! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! @SaieTamhankar @Riteishd @dnaAfterHrs @mid_day @MumbaiMirror @TOIMumbai @htTweets @dna @MissMalini @ZoomTV pic.twitter.com/4zahA76SoR
— US Consulate Mumbai (@USAndMumbai) April 30, 2019