हजारों, लाखों नाही, तर करोड़ों किंमतीचा हा मास्क घालून दिसली अभिनेत्री उर्वशी रौतेला, किंमत ऐकून फॅन्स चक्रावले

उर्वशीने घातलेला हा मास्क डायमंडपासून बनविला गेला आहे, जो खूप महाग आहे. उर्वशीच्या या मास्कची किंमत 3 कोटी आहे. अशा परिस्थितीत उर्वशीचा हा मास्क चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Apr 13, 2021, 06:18 PM IST
हजारों, लाखों नाही, तर करोड़ों किंमतीचा हा मास्क घालून दिसली अभिनेत्री उर्वशी रौतेला, किंमत ऐकून फॅन्स चक्रावले title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या लूकमुळे बर्‍याचदा चर्चेत असते, पण नुकत्याच एका व्हायरल व्हिडिओमुळे ती ट्रेंडमध्ये आहे. उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात उर्वशी मास्कमध्ये दिसली होती. तिचा हा लुक चाहत्यांसाठी धक्कादायक होता. कारण उर्वशी अशा लूकमध्ये पहिल्यांदा दिसली आहे.

उर्वशीच्या या मास्कबाबत लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधत होते. उर्वशीने घातलेला हा मास्क डायमंडपासून बनविला गेला आहे, जो खूप महाग आहे. एका रिपोर्टनुसार उर्वशीच्या या मास्कची किंमत 3 कोटी आहे. अशा परिस्थितीत उर्वशीचा हा मास्क चर्चेचा विषय ठरत आहे.

हा व्हीडिओ शेअर करताना उर्वशीने लिहिलं आहे की, ''डायमंड फुल मास्करेड. . ते खूप हेवी होते. यासाठी मला दोष देऊ नका.

यापूर्वी उर्वशीचे चाहते बरेच गोंधळले होते आणि तिला काय म्हणायचे आहे ते तिचे चाहते समजू शकत न्हवते. बर्‍याच लोकांनी उर्वशीचं कौतुक केलं होतं तर अनेकांनी तिला ट्रोलही केले होतं. एका नेटकऱ्याने असंही म्हटले की, 'यात नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण असा लूक अजिबात करता येत नाही.' त्याचवेळी उर्वशीच्या या व्हीडिओवर दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले की, 'तुम्ही यात फारच सुंदर दिसत आहात'.

आता जेव्हा चाहत्यांना उर्वशीच्या या मास्कची किंमत कळली आहे, तेव्हा तिच्या चाहत्यांचा दृष्टीकोन देखील बदलला आहे. कारण आता हे स्पष्ट झालं आहे की, हा मास्क तिच्या फॅशनचा एक भाग होता. जो तिने सोशल मीडियाद्वारे फ्लॉन्ट केला होता.उर्वशीने 'हेट स्टोरी 4', 'ग्रँड मस्ती', 'सनम रे' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आता ती तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे.