Ambani कुटुंबाच्या डिझायनरनं Urfi Javed साठी बनवली खास साडी!

Urfi Javed साठी अंबानींच्या डिझायनरने डिझाइन केली ही साडी... उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Feb 24, 2023, 07:13 PM IST
Ambani कुटुंबाच्या डिझायनरनं Urfi Javed साठी बनवली खास साडी! title=

Urfi Javed Wore designer Saree : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेला होता. उर्फी ही अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. कोण काय बोलले त्याची उर्फीला चिंता नसते तिला जे करायचं ते बिनधास्तपणे उर्फी करत असते. उर्फी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी उर्फीचा एक गोल्डन साडी नेसून एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तर उर्फीची ही साडी लोकप्रिय फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला (abu jani and sandeep khosla) यांनी डिझाइन केली होती. 

उर्फी ही तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात होतं. ती कधीच कोणत्या डिझाइनरकडे जात नाही, तर ती स्वत: तिचे कपडे डिझाइन करते. आता मोठं मोठे डिझायनर उर्फीकडे येऊ लागले आहेत. हे पाहता लोकप्रिय डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी देखील उर्फीसाठी एक सुंदर साडी डिझाइन केली. दरम्यान, आता हे दोघं कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अबू जानी आणि संदीप खोसला हे अंबानी कुटुंबाच्या जवळपास सगळ्याच कार्यक्रमांसाठी कपडे डिझाइन करतात. इतकंच काय तर नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या साड्या आणि लेहेंगे परिधान केले आहेत. (abu jani and sandeep khosla Ambani Family's Designers) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Prajakta Mali नं एका शब्दात केलं राज ठाकरे यांचं वर्णन, म्हणाली...

दरम्यान, उर्फीसाठी डिझाइन केलेल्या साडीचा लूक हा अप्रतिम आहे. उर्फी या साडीत खूप सुंदर दिसत आहे. या साडीला गोल्डन रंगाची एंब्रॉइडरी देखील आहे. ही साडी नेसून उर्फी खरंतर एखाद्या दिवा सारखी दिसत आहे. तर उर्फीनं सीक्वेंस वर्क असलेलं ब्रालेट ब्लाऊज म्हणून परिधान केलं आहे. तर उर्फीच्यासाडीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ही साडी नेसल्यानंतर उर्फीचा बोल्डनेस कमी झालेला नाही तर त्याला देखील जीवंत ठेवण्यासाठी तिच्या ब्लाऊजचं डिप नेक तिला साथ देत आहे.