मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही एक सोशल मीडिया सेन्सेशन आहे. उर्फी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्फी बऱ्याचवेळा तिच्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर सगळ्यांसमोर सांगताना दिसते. आता पुन्हा एकदा उर्फी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत एक भलीमोठी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये पंजाबी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून शोषण केले जात असल्याचे म्हटले जात आहे.
उर्फीनं त्या व्यक्तीसोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो तिच्याकडून सेक्शुअल फेवरची मागणी करत आहे आणि त्याला ब्लॅकमेलही करत आहे. यासोबतच तो तिला व्हिडिओ कॉलवर येऊन कॉम्प्रोमाइज करण्यास सांगत आहे. उर्फीनं त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्या चॅटचे स्क्रिनशॉर्ट शेअर केले आहेत. 'हा माणूस मला इतके दिवस त्रास देत होता आणि आता माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. दोन वर्षांपूर्वी कोणीतरी माझ्या चित्रांशी छेडछाड करून ते पसरवले.'
उर्फीनं पुढे म्हणाली, 'मी मात्र त्याबाबत पोलिस केस केली. तेथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यावेळी मला खूप त्रास झाला होता. मी 2 वर्ष जुनी पोस्ट देखील अपलोड केली आहे जी आता माझ्या प्रोफाइलवर आहे. या व्यक्तीने ती पोस्ट पाहून मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मी त्याच्यासोबत व्हिडीओ कॉलवर सेक्स करावा अन्यथा तो माझा तो फोटो बॉलीवूडच्या सर्व हँडल्सवर प्रसारित करेल आणि माझे करिअर बरबाद करेल, असे सांगितले. तो मला सायबर बलात्कारासाठी ब्लॅकमेल करत होता.'
उर्फीने पुढे सांगितले की, 'मी यामुळे निराश नाही. उलट मला आपला कायदा आणि सुव्यवस्थेचा त्रास आहे. वास्तविक, मी गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. 14 दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही कार्यवाई करण्याच आली नाही. मी मुंबई पोलिसांबद्दल अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. पण या माणसाबद्दलचा त्याचा दृष्टिकोन विचित्र आहे. मी तक्रार करूनही त्यांनी काय केले माहित नाही. मला माहीत नाही अशा किती महिला असतील ज्यांच्या तक्रारींवर कारवाई झाली नाही.'
उर्फी पुढे म्हणते, 'बरं, हा माणूस समाज आणि महिलांसाठी धोका आहे. त्याला मुक्तपणे जगण्याचा अधिकार नसावा. त्याचा शेवटचा फोटो हा त्याच्या बेस्ट फ्रेंडचा आहे. सेरा किशोर असे तिचे नाव आहे. मी तिची बहीण आशना किशोरसोबत काम केले आहे. मी बहिणींशी बोलले. त्यांना पुरावे पाठवले आणि सांगितले की तो दुसऱ्या मुलींसोबत काय करतो आणि कशा प्रकारे मला ब्लॅकमेल करत आहे.
उर्फीने पुढे म्हटलं की, 'पण काय झाले ते तुम्हाला माहितीये, त्यांनी त्या मुलाचे समर्थन केले आणि सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष केले. माझ्यासोबत इतर 50 मुलीही खोटं बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. खुप छान. ज्या रात्री तो मला ब्लॅकमेल करत होता त्या रात्री या मुली त्याच्यासोबत मज्जा करत होत्या. मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस काय कारवाई करतील माहीत नाही, पण मला सर्वांना सांगायचे आहे की हा माणूस उघडपणे पंजाबी इंडस्ट्रीत काम करतो.' उर्फीची पोस्ट पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.