ना टॉप, ना पँट....अंगावर चिटकवली फुलं...उर्फी जावेदने आता तर हद्दच केली

आता तर उर्फीने हद्दच केली राव...ना टॉप..ना पँट...नेटकरी म्हणतात फ्लॉवर नहीं फायर हैं ये...

Updated: Apr 24, 2022, 03:14 PM IST
ना टॉप, ना पँट....अंगावर चिटकवली फुलं...उर्फी जावेदने आता तर हद्दच केली title=

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी ड्रेसमुळेच नेहमी चर्चेत असते..कधी फक्त शर्ट घालून तर कधी ट्रान्सपरंट प्लास्टिक पँट घालून उर्फी सोशल मीडियावर धुमाकूळ घालते..

 

आता तर उर्फीने हद्दच केली राव...ना टॉप..ना पँट..अंगावर फक्त फुलंच फुलं....नेटकरी म्हणतात फ्लॉवर नही फायर हैं ये.

नेहमी चर्चेत कसं राहायचं हे अभिनेत्री उर्फी जावेदला चांगलंच ठाऊक आहे. त्यासाठी ती अतरंगी ड्रेस घालून लक्ष वेधून घेते. कसलाही फॅशन सेन्स नसलेले ड्रेस घालून फक्त वातावरण गरम करण्याचं काम उर्फी करत असते.

सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होऊनही उर्फीला फारसा फरक पडत नाही. आता तर उर्फीने हद्दच केली आहे. टॉपलेस होऊन अंगावर फुलं चिटकवून उर्फीने हे फोटोशूट केलं आहे. तिचा हा लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

न्यूड कलर शॉर्ट घालून उर्फीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमुळे मात्र उर्फी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे...यापूर्वीही अनेक वेळा बोल्ड लूकमुळे उर्फी ट्रोल झाली आहे.