मुंबईः उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र कपड्यामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीचा भाग राहिली आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे हेडलाईन्समध्ये असते. अभिनेत्री कायम स्वतःचे असे फोटो शेअर करत असते, ज्यामुळे तिला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे आणि रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत राहते. उर्फी नेहमीच विचित्र स्टाईल करून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
उर्फीचा आणखी एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे जो पाहून नेटकरी तिला विचारत आहेत तू एअरपोर्टवर आहेस की बीचवर? ब्लू बॅकलेस टॉप, ब्लॅक शॉर्ट्समध्ये उर्फी एअरपोर्टवर अनवाणी फिरताना दिसत आहे. त्यामुळे ती पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे
उर्फीच्या या लूकमध्ये एअरपोर्टवरही तिला सर्वांकडून न्याहाळलं जात आहे.
उर्फी नेहमीच तिच्या लूकमुळे आणि धाडसी वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतंच उर्फीने मुस्लिम मुलासोबत लग्न करणार नाही असं धाडसी विधान करत खळबळ उडवून दिली होती. त्याचं कारणही तिनं उघड केलं होतं, मी मुस्लिम मुलगी आहे. सोशल मीडियावर जेव्हा लोक माझ्यावर घाणेरड्या कमेंट करतात, तेव्हा त्यात बहुतांश मुस्लिम लोक असतात. त्या लोकांना वाटते की मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे.ते माझा तिरस्कार करतात कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या समाजातील स्त्रियांनी विशिष्ट पद्धतीने वागावं असं वाटतं. त्यामुळे मी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही असं उर्फीनं म्हटलं होतं.