Urfi Javed On Rabir Kapoor Comment on her fashion : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडची बेबो करीना कपूरनं (Kareena Kapoor Khan) तिला उर्फीची फॅशन चॉइस आणि कॉन्फिडन्स प्रचंड आवडतो हे सांगितले होते. इतकंच काय तर तिच्यात इतका कॉन्फिडन्स नाही की उर्फीसारखे अतरंगी कपडे परिधान करेल. करीनानं स्तुती केल्यानंतर आता उर्फीला कोणत्याच गोष्टीची भीती वाटतं नाही किंवा तिला कोणाचं व्हॅलिडेशन नको आहे. तर त्याचवेळी अभिनेता रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) उर्फीच्या फॅशन सेन्सला खराब टेस्ट असं म्हटलं होतं. त्यावर आता उर्फीनं प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फीनं आजवर फक्त सोशल मीडियावर नाही तर काही प्रोजेक्ट्समध्ये ही हटके फॅशनमध्ये दिसली होती. उर्फीच्या हटके फॅशनविषयी 'बिग बॉस ओटीटी' मध्ये सगळ्यांना कळलं होतं. त्यानंतर तिला नेहमीच कुठे ना कुठे पापाराझी स्पॉट करतात. दरम्यान, आता उर्फीनं 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरनं तिची स्तुती करण्यापासून रणबीर कपूरच्या कमेंटवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 'माझा तर विश्वास बसत नव्हता. मला आधी वाटलं की ही मस्करी सुरु आहे. तिनं माझ्याविषयी काही वाईटचं बोललं असणार आणि हे लोक फक्त माझ्याशी मस्करी करत आहेत की करीनानं माझी स्तुती केली. पण त्यानंतर मी जेव्हा व्हिडीओ पाहिला तेव्हा मला वाटलं की मी माझ्या आयुष्यात काहीतरी मिळवलं आहे. करीना कपूरनं माझं कौतुक केलं, मला वाटलं की मी साध्य करून दाखवलं' असं उर्फी म्हणाली.
पुढे उर्फी म्हणाली की, 'करीनानं आता तिची स्तुती केली आहे तर आधी रणबीर जे म्हणाला त्याला काही अर्थ नाही. उर्फी म्हणाली, 'रणबीर कपूरने जी खराब टेस्टची कमेंट केली होती, त्यानं मला खूप वाईट वाटलं होतं. पण करीनानं जेव्हा स्तुती केली तेव्हा वाटलं की खड्यात गेला रणबीर कपूर, करीना कपूरनं माझी स्तुती केली आहे. आता रणबीरची काय औकात. मला कोणच्या प्रमाणपत्राची गरज नाही.' (भाड़ में जाए रणबीर कपूर, करीना कपूर ने मेरी तारीफ करी है। अब क्या रणबीर की औकात है। मुझे किसी के वैलिडेशन की जरूरत नहीं।)
हेही वाचा : VIDEO : Malaika Arora ला पाहताच बायकोला विसरला, अभिनेत्रीचा हाथ पकडला अन्...
उर्फीनं आजवर सिमकार्ड पासून गजऱ्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे ड्रेस बनवले आहेत. तिचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा गजऱ्याचा नवीन ड्रेस परिधान केला आहे.