बॅकलेस ड्रेसमध्ये उर्फीचा रेट्रो लुक, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Updated: Jun 13, 2022, 03:30 PM IST
  बॅकलेस ड्रेसमध्ये उर्फीचा रेट्रो लुक, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क title=

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्सची फॅन्सना फार उत्सुकता असते.आता नुकताच तिचा नवीन लुक समोर आला आहे. या नवीन लुकमध्ये तिने भन्नाट डान्स देखील केला आहे.  

दररोज उर्फी जावेद तिच्या दमदार लूकसह पापाराझींवर हजर असते. एकूणच, उर्फी फॅन्समध्ये स्वतःबद्दलची क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नसते. उर्फीला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र तरीही या ट्रोलर्सना बाजूला ठेवून उर्फी तिच्या आयुष्यात पुढे जाताना दिसतेय.  त्यामुळेच आज उर्फीची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढलीय. 

उर्फी जावेदने नुकताच नवीन लुक शेअर केला आहे. उर्फीने तिच्या नवीन लूकसह डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांना खुप आवडला असून यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.  

व्हिडिओत काय? 
व्हिडिओमध्ये उर्फी जावेद 'ओ हसीना झुल्फो वाली' या आयकॉनिक गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आशा पारेखच्या या आयकॉनिक गाण्यावर उर्फी जावेदचा हा डान्स प्रेक्षकांना आवडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

 नवीन लूक
उर्फीच्या लूकबद्दल सांगायचे झाले तर, उर्फी ब्लू कलरचा बॅकलेस वन पीस शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. हा कलर तिच्यावर खुप खुलुन दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने एक कॅप्शनही लिहलेय, मला वाटले की या गाण्यासोबत हा ड्रेस आणखी चांगला दिसेल, असे लिहलेय. 

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. यामुळेच व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही तासांतच त्यावर हजारो लाईक्स आले आहेत.