रणबीर कपूर नाही तर, या खास व्यक्तीसोबत Alia Bhatt निघाली लंच डेटला

आलियाच्या आयुष्यातील रणबीरची जागा नक्की घेतली तरी कोणी, त्या एक फोटोनंतर चर्चांना उधाण   

Updated: Jun 13, 2022, 03:20 PM IST
रणबीर कपूर नाही तर, या खास व्यक्तीसोबत Alia Bhatt निघाली लंच डेटला title=

मुंबई : 'गंगूबाई काठियावाडी', 'आरआरआर' सिनेमामच्या यशानंतर अभिनेत्री आलिया भट्टने स्वतःचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला आहे. आलिया सध्या 'द हार्ट ऑफ स्टोन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडची क्यूट गर्ल तिच्या खासगी त्याचप्रमाणे प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. महत्त्वाचं म्हणजे आलिया आणि अभिनेता रणबीर कपूरचं लग्न झालं, तेव्हापासून चाहतेअभिनेत्रीच्या सोशल मीडियावर पोस्टच्या प्रतीक्षेत असतात. आता देखील आलियाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

फोटोमध्ये आलिया पती रणबीरसोबत नाही तर कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहे. सिनेमाच्या शूटिंगमधून वेळ काढून आलिया भट्ट तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत लंच डेटचा आनंद घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया भट्टची आई आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनी राजदान यांनी लंच डेटचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया, शाहीन आणि सोनी या तिघीही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. 

सोनी राजदान यांनी फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'Hello there' असं लिहिले आहे. पोस्टवर कमेंट करत आलिया म्हणते, 'हॅलो मम्मी.'.. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.