Urfi Javed Dress is for Sale : सोशल मीडियावर नेहमीच स्टाईलमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद तिच्या स्टाईल आणि हटेक फॅशनमुळे चर्चेत असतात. पण आता तिचा ड्रेसिंग सेन्स हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. उर्फीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पण किंमत वाचल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक काळ्या रंगाच्या गाउनमध्ये दोन फोटो शेअर केले आहे. हा तिचा गाऊन फुलपाखरु असलेला आहे त्यात झाडाच्या पानाची डिझाइन करण्यात आली आहे. तर हा ड्रेस उर्फी चक्क 3.66 कोटींमध्ये विकत आहे. त्यात उर्फीनं लिहिलं की 'मी माझा बटरफ्लाय ड्रेस विकण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर हा ड्रेस सगळ्यांना खूप आवडला होता. हाच ड्रेस मी विकत असून त्याची किंमत 36690000 आहे. ज्या लोकांना हा ड्रेस खरेदी करायचा आहे, त्यांनी मला DM करा.'
उर्फीनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की फक्त 50 रुपये कमी झाले नाही तर मी घेतला असता. दुसरा नेटकरी म्हणाला, 'ईएमआयवर घेता येईल का? मी मोतीचूरचा लाडू कर म्हणून देऊ शकतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'काय हा ड्रेस डायमंडचा आहे, जे 3 कोटी किंमत ठेवली आहे?' एक नेटकरी म्हणाला, मित्रांनो ती मस्करी करते. दुसरा नेटकरी म्हणाला, '1000 रुपयात द्यायचा असेल तर दे नाही तर मी पुढे जाते.' उर्फीची बहीण डॉलीनं देखील त्यावर कमेंट करत लिहिलं की 'मी हा ड्रेस खरेदी केला असता, पण माझ्याकडे एक डॉलर कमी आहे.'
हेही वाचा : कंगना रणौतसोबत नवरा आदित्य पंचोलीच्या अफेयरवर झरीना म्हणाली, 'ती अनेकदा घरी यायची आणि...'
दरम्यान, उर्फी विषयी बोलायचे झाले तर ती प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेली सीरिज 'फॉलो कर लो यार' मध्ये दिसत आहे. ही 9 एपिसोडची सीरिज आहे. त्याशिवाय उर्फीनं तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहते. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 5.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.