धक्कादायक : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या ICU ची वाढवली सुरक्षा

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Updated: Aug 22, 2022, 08:17 PM IST
धक्कादायक : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या  ICU ची वाढवली सुरक्षा title=

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकत्याच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कॉमेडी स्टारची तब्येत अनेक चढ-उतारांमधून जात आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव असलेल्या आयसीयूमध्ये एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्याची त्यांच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

अज्ञात व्यक्ती आयसीयूमध्ये दाखल
नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, काही अज्ञात व्यक्ती आयसीयूमध्ये घुसले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढू लागले. मात्र, सुरक्षारक्षकांची नजर त्यावर पडताच त्यांना तेथून बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली असून कॉमेडियनच्या सुरक्षेबाबत त्याचे कुटुंबीय खूप चिंतेत असल्याचं सांगण्यात येत आहे.  कॉमेडियनची प्रकृती अजूनही नाजूक आहे. त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयसीयूबाहेर कडक सुरक्षा
राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये दाखल होऊन १२ दिवस झाले आहेत. याशिवाय त्यांचे चाहते आणि जवळचे मित्र राजू बरं होण्याची वाट पाहत आहेत. कॉमेडियन सध्या आयसीयूमध्ये आहेत. इतकंच नाही तर संसर्ग टाळण्यासाठी कोणालाही आयसीयूमध्ये प्रवेश दिला जात नाही. तरीही एक अनोळखी व्यक्ती राजू यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आयसीयूमध्ये दाखल झाली. मात्र, आता आयसीयूबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.