मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आज 22 ऑगस्ट रोजी त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चिरंजीवी (Chiranjeevi) यांचे फक्त दाक्षिणेत चाहते नाही तर संपूर्ण देशात आहेत. लाखो हृदयांवर राज्य करणारे चिरंजीवी करोडोंच्या संपत्तीचे देखील मालक आहेत. यानिमित्त जाणून घेऊयात त्यांची एकूण संपत्ती.
इंद्रा, स्टालिन, टागोर आणि बिग बॉस सारखे दिग्गज चित्रपट देणारे मेगा स्टार चिरंजीवी (Chiranjeevi) हे सिनेविश्वातील एक मोठे नाव आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. चिरंजीवी (Chiranjeevi) असे नाव आहे ज्यांच्या नावानेच चित्रपट हिट होतो.
चित्रपटांसाठी घेतो इतकी रक्कम?
चिरंजीवीच्या (Chiranjeevi) कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे त्याचे चित्रपट आणि जाहिरात आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 20 ते 25 कोटी इतकी तगडी फी घेतो. यासोबतच तो ज्या ब्रँडच्या जाहिराती करतो त्यातून तो भरपूर पैसे कमावतो. caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
आलिशान घर
चिरंजीवीचा (Chiranjeevi) हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये आलिशान बंगला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या बंगल्यात जागतिक दर्जाच्या वस्तू आहेत. त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास 38 कोटी रुपये आहे. यासोबतच त्याचे बंगळुरूमध्येही घर आहे.
लक्झरी कार
चिरंजीवीला (Chiranjeevi) लक्झरी गाड्यांचीही खूप आवड आहे. जगातील सर्वात रॉयल कार मानल्या जाणार्या रोल्स रॉयल्सपासून रेंज रोव्हरपर्यंत अनेक आलिशान गाड्या त्याच्या कारच्या ताफ्यात आहेत.
दरम्यान चिरंजीवी (Chiranjeevi) सध्या त्याचा आगामी चित्रपट गॉडफादरमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुपरस्टार सलमान खानही कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.