नवी दिल्ली : दिल्ली येथील मादाम तुसाद या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहालयात सदाबहार गायिका आशा भोसलेंचाही पुतळा लागला आहे.
मराठी, हिंदी, बंगाली अशा विविध भारतीय भाषांमध्ये आशाजींनी गाणी गायली आहेत. आशाजींचे नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही नोंदवले गेले आहे. आता आशाजींच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
लंडनप्रमाणेच भारतामध्येही मादाम तुसाद हे मेणाच्या पुतळ्याचे संग्राहलय सुरू झाले आहे. त्यामध्ये आज आशा भोसलेंच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पुतळ्याचे अनावरण करताना आशा भोसलेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लाईव्ह स्ट्रिमिंग केले होते.
— ashabhosle (@ashabhosle) October 3, 2017
लावणीपासून अगदी भावगीतांपर्यंत आशा भोसलेंचा आवाज सार्याच गाण्यांसाठी अगदी चपखल बसतो. १९४३ साली 'माझं बाळं' या चित्रपटामधून आशाजींनी पार्श्वगायनाला सुरूवात केली. भारतीय कलाकारांप्रमाणेच ब्रेट ली या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसोबतही आशाजींनी खास गाणं रेकॉर्ड केले आहे. तसेच देशाप्रदेशातही त्यांनी अनेक लाईव्ह शोज केले आहेत.