मुंबई : "जब तक है जान" या सिनेमासाठी शाहरूख खानला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या ज्या त्याने कधीच केल्या नव्हत्या. अगदी शाहरूख खानने त्याच्या मनाविरूद्ध काही गोष्टी या सिनेमात केल्या आहेत.
यश चोप्राचा हा शेवटचा सिनेमा रिलीज होऊन पाच वर्ष झाली. पण याचे किस्से आजही चर्चेत आहेत. 'जब तक है जान' या सिनेमात शाहरूख खानने पहिल्यांदा ऑनस्क्रीन आपल्या को अॅक्टरला किस केलं आहे. जरी शाहरूख खानला "रोमांस किंग" म्हणत असले तरीही त्याने या अगोदर कोणत्याही को - स्टारला किस केलं नव्हतं. त्याचप्रमाणे शाहरूखने या सिनेमा घोडस्वारी केली. आणि हे करण्यासाठी त्याला खुद्द यश चोप्रा यांनी तयार केलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की, स्क्रिप्टची मागणी पूर्ण करण्यासाठी हे करणं गरजेचं होतं.
'जब तक है जान' हा यश चोप्रा यांचा पहिला सिनेमा आहे की, ज्यामध्ये लता मंगेशकर यांचा एकही गाणं नाही. तसेच या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा गुलजार आणि ए आर रहमानसोबत काम केलं आहे.
तेरी आंखों की नमकीन मस्तियां
तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां
तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां
नहीं भूलूंगा मैं, जब तक है जान, जब तक है जान
तसेच शाहरूख खानने बोललेली ही कविता स्वतः फिल्म मेकर आदित्य चोप्रा यांनी लिहिली आहे. या गाण्याला नंतर सिनेमाच्या ऑफिशिअल अल्बममध्ये सहभागी करून घेतली होती. जब तक है जान या सिनेमातून तब्बल आठ वर्षांनी यश चोप्रा यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. या अगोदर त्यांनी "वीर जारा" हा सिनेमा तयार केला होता. जब तक है जान हा त्यांचा २२ वा आणि शेवटचा सिनेमा ठरला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या अगदी एक महिना अगोदर यश चोप्रा यांचे निधन झाले. या सिनेमासोबत यश चोप्राने बॉलिवूडमध्ये तब्बल ५० वर्षे पूर्ण केली आहे.